कोळसा चोरीमुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली!


चंद्रपुरात मागील अनेक एक वर्षापासून सबसिडीचा कोळसा अधिकाऱ्यांशी संगनमत करून खुल्या बाजारात चोर मार्गाने विकल्या जात आहे, यामुळे प्रामाणिकपणे लिलावाच्या कोळसा घेणारे प्रामाणिक व्यापारी त्रस्त झाले आहेत. वेकोली कडून होणाऱ्या अधिकृत लिलावामध्ये कोळसा घेऊन तो प्रामाणिकपणे बाजारात विकल्या जातो. अनेक व्यापारी हा व्यवसाय प्रामाणिकपणे करून वेकोली ला लाभ पोचवत असतात, परंतु मागील अनेक वर्षापासून नेत्यांच्या व वेकोलीतील स्थानिक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही पांढरपेशे कोळसा तस्कर या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. लघु मध्यम उद्योगांना शासनातर्फे सबसिडीवर मिळणारा करोडो रुपयांचा कोळसा भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन हा कोळसा लघु उद्योगा पर्यंत न पोचता तो अन्यत्र चोर मार्गाने कोल डपोवर जमा करून खुल्या बाजारात सरेआम विकल्या जात आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे वेकोलिच्या लिलावामध्ये कोळसा घेऊन चिल्लर व्यापाऱ्यांना विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संकट कोसळले आहे. चोरट्या मार्गाने जर वेकोलि मधून कोळसा चोरी करून विकल्या जात असेल तर लिलावामध्ये अधिकृतपणे कोळसा घेऊन वेकोलीला मिळणारा लाभ व शासनाला मिळणारा कर डुबविल्या जात असेल तर प्रामाणिकपणे लिलावात कोळसा घेऊन व्यापार करण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न नाव न सांगण्याच्या अटिवर एका व्यापाऱ्याने आम्हाला सांगितले. वेळीच या कोळसा चोरांवर आळा घातला नाही तर लिलावामध्ये कोळसा न घेता तो चोर मार्गाने बाहेर काढून बाजारात विकल्या जाईल यात काहीही शंका नाही. वेकोलि प्रशासनाने यावर त्वरित प्रतिबंध लावा अशी मागणी लिलावात कोळसा घेणारे प्रामाणिक व्यापारी दबक्या स्वरात करू लागले आहे.
लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्या मागणीप्रमाणे कोळसा सबसिडीवर देण्याच्या शासनाच्या नियम आहे. चंद्रपुर व वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून हा कोळसा संबंधित उद्योगांना पोहोचता व्हावा असा शासकीय नियम आहे. परंतु सबसिडीवर मिळणारा हा कोळसा नागपूर व व चंद्रपुरातील काही कोळसा तस्कर आपल्या राजकीय वशिल्यातून व वेकोलीतील अधिकाऱ्यांशी साठ करून खाजगी टालावर जमा करतात व नंतर तोच चोरीचा कोळसा खुल्या बाजारात विकतात त्यामुळे लिलावात कोळसा घेणाऱ्यांसाठी ही डोकेदुखी ठरली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वी असे अनेक कोळसा चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहेत काही न्यायप्रविष्ट आहेत तर काहींना देवाण-घेवाणीतून वाट मोकळी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या