गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे - आ.मुनगंटीवार


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे . त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत . या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे . या परिस्थितीत 400 युनिट पर्यंत  विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या