चंद्रपुर : कोरोना चे मोठे संकट देशावर कोसळले आहे. या संकटकालिन समस्येतुन बाहेर निघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामध्ये २१ दिवसांचा लाक डाऊन पाळण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यावर आलेल्या या संकटसमयी मुख्यमंत्री कोषामध्ये सहाय्य करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) या संघटनेने शनिवार दि. २८ मार्च २०२० रोजी चंद्रपुर चे जिल्हाधिकारी खेमणार साहेबांना बानाई चंद्रपूर च्या वतीने ₹100000/- (रू. एक लाख) चा धनादेश इंजि. चेतन उंदिरवाडे आणि प्रा. निरज नगराळे यांनी सुपुर्द केला.
1 टिप्पण्या
Very nice work
उत्तर द्याहटवा