कोरोना--संचारबंदी (काटोल, नागपूर येथील कवी सूरेश राठोड यांची बोलकी कविता आमच्या सुज्ञ वाचकांसाठी...)


(भारतात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि स्वकियांना गावी परत आणण्यासाठी मला विविध आघाड्यांवर लढावं लागलं.मित्र मंडळींच्या सहकार्याने मला त्यात यश पण आलं.काल अशाचं एका नातेवाईकाचं मला फोन आला. त्याची उद्विग्नता काव्यरुपात......)

*सरकार दादा जरा,*
*समजून तर घेना!*
*कामगार लोकाईले,*
*गावी जाऊ देना.....!!१!!*

*कोरोनाची बिमारी ही,*
*आम्ही थोडी आणली!*
*विदेशातून आलेल्याची,*
*म्हैस इथं जनली....!!२!!*

*आम्ही तर पोटासाठी,*
*काम करायला आलो!*
*श्रीमंतानं पाप केलं,*
*आम्हीचं कैद झालो....!!३!!*

*आरं तसं बी या गरीबाले,,*
*मरन कुठं हायं!*
*कोरोनाची महामारी बी,*
*आम्हाले खाणार नायं.!!४!!*

*मेला बी तं गरीब मरन,*
*तुमचं काय जाणार!*
*आजा गेला नातू आलं,*
*बरोबरचं होणार....!!५!*
==========================
©® ----------------- 【कवी】------
                                *सुरेश राठोड*
                            【काटोल-नागपूर】
                                       *7350739565*
२८०३२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या