सार्वजनिक बांधकाम खाते कर्म. सहकारी पत संस्थेतर्फे रु.1 लक्ष ! मुख्यमंत्री सहाय्यता व जिल्हा सहाय्यता निधीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद



चंद्रपूर, दि.8 एप्रिल : कोरोना आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी  मोठ्या प्रमाणात आर्थिक  मदत आवश्यक आहे. त्यामुळेच दानशूर व्यक्ती व संस्थांनी समोर येऊन  आपले योगदान  द्यावे  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी प्रमाणेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी जिल्हा सहाय्यता निधी कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

आज प्रामुख्याने  सार्वजनिक बांधकाम खाते कर्म. सहकारी पत संस्थेतर्फे रु.1 लक्ष, जितेंद्र टोंगे,अध्यक्ष तंत्र शिक्षण कर्मचारी सहकारी पत संस्थेतर्फे रु.25 हजार, कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 1 लक्ष,सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या.चंद्रपूर तर्फे 1 लक्ष रुपये, श्री. साईबाबा मंदीर निर्माण मंडळातर्फे1 लक्ष  11 हजार, महाकाली देवस्थान 2 लक्ष 11हजार, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कडून रुपये 25लक्ष, चंद्रपूर  जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, चंद्रपूर कडून 51 हजार रुपये , सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक चंद्रपूर शाखेकडून रुपये 1 लक्ष,रमेश कोतपल्लीवार कडून रु. 51 हजार तर एन.एच.गौरकार यांचेकडून रु. 21 हजार  कलेक्टर चंद्रपूर कोविड-19 या बँक खात्यात देणगीदार व संस्थाकडून जमा करण्यात आले.

            त्यासोबतच  मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र खात्यामध्ये महाकाली देवस्थान तर्फे 3 लक्ष,  मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे 2 लक्ष 11 हजार 863 , माजी खासदार नरेश पुगलिया रुपये 2 लक्ष, बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्ट तर्फे 2 लक्ष रुपये, महापौर राखी कंचर्लावार रुपये 1 लक्ष, मिलिंदकुमार भरणे (सिपेट) रुपये 3लक्ष, हर्षल ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे रुपये 50हजार, कॅलिबर मेरकँटिले प्रा. लिमि. मार्फत रुपये 3लक्ष, धनोजे कुणबी समाज मंदिर तर्फे 1 लक्ष 11हजार,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असो. ऑफ इंजिनिअर चंद्रपूर तर्फे 1 लक्ष , श्रीमती निरुपा बेंडले रुपये 1 लक्ष, व्यंकटेश्वरा टेम्पल ट्रस्ट मार्फत रुपये 1लक्ष,  आनंद नागरी सहकारी बँक लिमि. तर्फे 1 लक्ष रुपये,  अंबादेवी देवस्थान वरोरा तर्फे 1 लक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 1 लक्ष,  प्रमोद उरकुडे  रु.31 हजार , प्रदिप नगराळे रु.5 हजार , राहुल जवादे ग्लोबल मेडीहेल्थ इन्फ्रास्ट्र्रक्चर प्रा. लि. तर्फे रु. 50हजार, पारस कांबळे,( ऊर्जा सोशल अंड कल्चरल फाउंडेशन) तर्फे रुपये 31 हजार, रविंद्र भागवत तर्फे रु.  35 हजार 500 तर जेसीआय  संस्थेतर्फे रु. 21हजार देणगी स्वरूपात देण्यात आले.

         कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक,कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या