सध्या देशावर ओढवलेली भयानक परिस्थिती बघता जेवढी मिळेल तेवढी कमीच अशी मदतीची स्थिती झाली आहे. गरजूंना मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले नितीन शर्मा यांनी गडचांदूर सोबत ची आपली सामाजिक बांधिलकी जोपासत गडचांदूर करांना 100 अन्नधान्याची किट वाटपासाठी उपलब्ध करून दिल्या. जिवनावश्यक असलेल्या तांदूळ, आटा, तेल, तूर डाळ, बेसन, साखर, तिखट, मिरची पावडर, हळदी मसाला, साबण, चना, खोबरा तेल, चायपत्ती असलेल्या या अन्नधान्याच्या किट दिल्याबद्दल गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, सभापती विक्रम येरणे, गटनेता कल्पना निमजे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम यांनी नितीन शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहे.
नितीन शर्मा यांनी आधी ही नागपूर येथे दररोज 350 पोलिस, महानगरपालिका कर्मचारी यांना नास्ता वितरणासोबतचं मेयो रुग्णालयात डॉक्टरांना 65 किट personal protection kit (PPE), sanitizer, mask चे वाटप करून समाजसेवा करीत आहे.
0 टिप्पण्या