कोरोना विरुद्धच्या लढ्यात 11 हजार कर्मचाऱ्यांचा सहभागतपासणी करणारे डॉक्टर ते साफसफाई करणारे कर्मचारी आपले 'रियल हिरो '


चंद्रपूर,दि.19 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. मात्र ही परिस्थिती कायम राहावीजिल्ह्यात  कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नयेयासाठी डोळ्यात तेल घालून  विविध विभागाचे हजारो कर्मचारी काम करीत आहे.जीव धोक्यात घालून तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारीजागता पहारा देणारे पोलीस, महानगरपालिकानगरपालिकेचे सफाई कामगार ते सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतीच्या शिपायांपर्यंत सगळेच कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत खरे हिरो ठरले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डीचंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात जवळपास 11 हजार कर्मचारी सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या विरुद्ध कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरेजिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोडजिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत या तिघांच्या नेतृत्वात 200 डॉक्टर आणि 300 आरोग्य कर्मचारी अग्रणी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष तपासणी करण्यापासून तर जिल्ह्याच्या टोकावरील गावांमध्ये आलेल्या नव्या रुग्णांची नोंद घेण्यापर्यंत आरोग्य विभाग आपली सेवा देत आहे. प्रत्येकाकडे कामांचे वाटप करण्यात आले असून समन्वयाची भूमिका जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले पार पाडत आहे.

महसूलपोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन,  याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या राज्य शासनाच्या अनेक विभागाचे शेकडो कर्मचारी या युद्धात आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत.

जिल्ह्यातील 595 ग्रामसेवक, 2 हजार 563अंगणवाडी सेविका, 2 हजार 392 अंगणवाडी मदतनीस, 1 हजार 907 आशा वर्कर, 1 हजार 300ग्राम कर्मचारी याकाळात देवदूत बनून रस्त्यांवर उतरले आहे.

महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारीसर्व तहासिलदार यांच्यासह 1 हजार 206 अधिकारी व कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागातील 191 अधिकारी 3179  पोलीस कर्मचारी असे 3370 कर्मचारी रस्त्यावर झटत आहे.

या लढ्यातील महत्त्वाचा योद्धा म्हणजे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारीडॉक्टरपरीचारीकाएएनएम,आशा व अंगणवाडी सेविका हे आहेत. ग्रामीण भागातील 6 हजार 435, शहरी भागात 431तर महानगरपालिका अंतर्गत 304 म्हणजेच जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्य विभागाचे एकूण 7170आरोग्य कर्मचारी काम करीत आहे.

या युद्धात स्वयंसेवी संस्थाचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थेचा व इतर मनुष्यबळ ग्रामीण भागात 2310, शहरी भागात 929, महानगरपालिका अंतर्गत 1870 असे एकूण 5 हजार 109 इतर मनुष्यबळ कार्यरत आहे.त्याचप्रमाणे,सोयी सुविधेसंदर्भात व आवश्यक असणारी माहिती आपल्यापर्यंत पोहचविणारे पत्रकारजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार ,तसेच विद्युत कर्मचारी असे अनेक अनामिक योध्दे या कोरोना विरुध्दच्या लढ्यात सहभागी आहेत. हा आकडा एकत्रित केल्यास 15 हजारावर कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी कार्यरत आहेत.

कोरोना विरुद्धच्या युद्धात लढ्यात अहोरात्र झटणाऱ्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारीपोलीससैनिकआरोग्य अधिकारी व कर्मचारी डॉक्टरपरीचारीकाएएनएमआशा व अंगणवाडी सेविका यासोबतच यांच्या मदतीला काही तालुक्यांमध्ये शिक्षकसुद्धा पुढे आले आहे. या योध्दयांप्रती कृतज्ञता म्हणून नागरिकांनी घरातच राहावे व या युद्धात घरातच राहून सहभाग द्यावाअसे प्रशासनाचे आवाहन आहे.

आरोग्य विभाग ... 7170

महसूल विभाग..... 1126

पोलीस विभाग ..... 3370   

स्वयंसेवी संस्था .... 5000

Ø  जिल्हयात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही

Ø  स्वयंसेवी संस्थांचे 5 हजार कार्यकर्ते सक्रिय

Ø  दानशूर संस्थाप्रतिष्ठाने मदतीला पुढे

Ø  साडेतीन हजार पोलिस कर्मचारी तैनात

Ø  अनेक वरिष्ठ अधिकारी 18 ते 20 तास कार्यरत

Ø  शेकडो अनामिक हातांचेही पाठबळ


((((((++--------महत्वाचे क्रमांक------------++)))))

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा,अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या