लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे लोकं आता आता लॉकडाऊन संपायची वाट पाहत आहे. कधी 14 तारीख उजाडते असं अनेकांना झालंय. मात्र 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन अशी शक्यताही कमी आहे. कारण 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोना 'मातोश्री'च्या उंबरठ्यावर, मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण
आरोग्य यंत्रणेचे सद्यस्थिती
राज्य शासनाकडे 37 हजार PPE (पर्सनल प्रोटोक्टिव्ह इक्विपमेंट) 37 हजार, साधारण दोन-सव्वा दोन लाख मास्क कोविड रुग्णालयाकडे आहेत. 1500 वेंटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने परिपत्रक काढलं आहे PPE, N95 मास्क, वेंटिलेटर्स राज्य सरकार खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 2125 वेंटिलेटर, 8 लाख 41 हजार N95 मास्क, 3 लाख 14 हजार PPEs ची मागणी केली आहे. केंद्राने देश स्तरावरून हे उपलब्ध करून दिले पाहिजे, आम्ही पाठपुरवठा करू असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
सरकारकडून दोन समित्यांची स्थापना
डॉक्टरांची हाय पावर समिती केंद्र सरकारच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का? याबाबत अभ्यास करेल. मृतांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असे आजार असलेले रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या को-मॉर्बिडीटी म्हणजे पूर्वीचा आजार हे प्रमुख कारण समोर आलं आहे. मुंबईतील जेजे, केईएम यांसारख्या रुग्णालयातील लोकांच्या मदतीने सरकारला सल्ला देण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मृतांचा आकडा कसा कमी करता येऊ शकेल याबाबत सरकारला सल्ला देईल.
0 टिप्पण्या