आश्चर्यकारक सत्य...., संचारबंदी नंतर "मृतकां"च्या संख्येत लक्षणिय घट!

      
 "यम"राज ही कोरोना ला घाबरला कां? अशा उपहासात्मक चर्चेला पेव!

   चंद्रपुर (विशेष लक्षणिय) 
   आज सगळीकडे कोरोना ची धास्ती पसरली आहे, कोरोना मुळे भारतात मृत्यूचे प्रमाण अल्प असून यातून बर्या होणार्या रूग्णांची संख्याही लक्षणिय अशीच आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आश्चर्य म्हणजे दररोज होणाऱ्या मृतकांच्या प्रमाणामध्ये कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. कुणाचा ही मृत्यू व्हावा हे याठिकाणी अपेक्षीत नाही परंतु होणारी घटना व येणारा मृत्यू कोणीही टाळू शकत नाही असे म्हणतात आणि ते खरेच आहे. स्थानिक शांतीधाम मधील व्यवस्थापक राजेंद्र गर्गेलवार यांनी ही या सत्यावर उजेड टाकला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी रोज सहा-सात मृत्यू व्हायचे. डेड बॉडी आणण्यापूर्वी वेळ निर्धारीत केला (booking) जायचा. परंतु मागील एक महिन्यापासून म्हणजेच संचारबंदी लागल्यापासून एक किंवा दोन मृत्यू होत असतात आणि कधी-कधी तर दोन-दोन दिवस मृत्यू होत नसल्याचे अकल्पित सत्य आहे. पूर्वी होणारे रोड अपघाती मृत्यू, आजारपणामुळे होणार्या मृत्युंची सरासरी झालेली घट हा विचार करण्याचा विषय आहे. आणि हीच परिस्थिती बहुतेक सगळीकडील आहे. अपेक्षेक्षा कमी झालेले प्रदूषण, कमी झालेली (नगण्य) व्यसनाधिनता, कोरोना च्या भितीने व स्वत:च्या सुरक्षिततेच्या एकाग्रतेमुळे शरीरातील व्यांधिंकडे होणारे दूर्लक्ष या बाबी बहुतेक मृत्युची सरासरी कमी होण्यामागे कारण राहू शकते. कारण कोरोना या आजाराचेचं कां असेना? मृत्यु वर ताबा मिळविण्याचे एक शस्त्र यामुळे हाती लागले असे म्हणण्यात काही हरकत नाही. मनुष्याने स्वतःसाठीच घातक बनविलेल्या बाबींवर आता तरी नियंत्रण आणायला हवे. रस्त्यावर होणारे अपघात, प्रदूषणामुळे होणारे आजार यावर आपणच नियंत्रण आणू शकतो हे मात्र आजच्या ओढवलेल्या परिस्थीतीने शिकविले आहे.

मृत्यू हे जीवनाचे कटू सत्य आहे. जीवन आहे तर मृत्यू येणारच हे निश्चित आहे. मरण्यासाठीचं जगायचे असते पण मृत्यूनंतर ही मनुष्याने जिवंत रहावे असेच कार्य केले पाहिजे असे सुजाण म्हणतात. कोरोनाच्या भीतीने आज संपूर्ण देशात लाॅकडाऊन झाले आहे. जगात कोरोनामुळे व्यवहार-रस्ते थांबले आहेत, जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या रोगाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सगळेचं झटपटत आहेत. यात ही जिवनाचे नवनविन मंत्र फार काही शिकवून जाणारे आहे. आपापल्या कुटूंबासोबत जाणारी ही वेळ ही आयुष्यात संस्मरणीय अशीच राहील यात काही शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या