चंद्रपुर : मे. काठीयावाड कोल आणि गुजरात कोल अंड कोक चा सबसिडी चा कोळसा पडोली च्या कोळसा टालांची ची शोभा वाढवत आहे. मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत असलेल्या डिओ चा हजारो टन कोळसा पडोली च्या कोळसा चोरांच्या टालावर पोचला आहे. सबसिडीच्या दरात मिळणारा हा कोळसा पडोली येथील टालावरून मोठ्या किमतीत चोर बाजारात अधिकाऱ्यांची साठ-गाठ करून विकला जाणार. यात कोळसा खाणींना करोडो रुपयाच्या चूना लावण्यात कोळसा तस्कर यशस्वी झाले, यात काही शंका नाही. या संबंधात वारंवार वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ही स्थानिक अधिकाऱ्यांशी असलेल्या हातमिळवणीतून हा चोरीचा प्रकार कागदोपत्री घड्या नीट बसवून करण्यात आला आहे. आज देशावर कोरोना या महाभयंकर बिमारीचे संकट कोसळले आहे. या संकटाला मात देण्यासाठी देशातील साधारण व्यक्ती पासून तर मोठ्या उद्योगपतींनी पंतप्रधान मोदी व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हाकेला देत मदतीची साथ दिली आहे.
एकीकडे देश संकटातून उभरण्याच्या प्रयत्नात असतांना कोळसा चोर मात्र सबसिडीच्या कोळसा चोरीतून सरकारलाच नाही तर सर्वसामान्यांना ही लुटण्यात अग्रेसर राहिले आहे. एकीकडे कोरोनाचे युद्ध कर दुसरीकडे पडोली च्या टालावर कोळसा तस्करांच्या लुटालुट कार्यक्रम सुरू होता. चोरीच्या या नाट्याचे हे काही भाग आहेत आणखीन पूर्ण नाट्य पुन्हा कधी सुरू होईल आणि कोळसा तस्करांवर कायद्याच्या बडगा वेकोली प्रशासन कधी व कसा उगारेल हे पाहणे आता बाकी आहे. कोळसा चोरीच्या या नाटकाचे किती भाग अजून अधिकाऱ्यांच्या सहभागाने चालतात हे बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
काळोख्या रात्री चालणारा कोळसा तस्करांच्या सबसिडीच्या कोळसा पडोली च्या टालावर रातोरात पोहोचविण्याच्या खेळ 31 तारखेपर्यंत सुरळीत सुरू होता. खुलेआम कायद्याची पायमल्ली होत होती.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र स्टेटस मायनिंग कार्पोरेशनच्या सबसिडी अंतर्गत कैलास अग्रवाल यांच्या 26 गाड्या कोळसा चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर वेकोली प्रशासनाने मायनिंग कार्पोरेशनचे करार रद्द केला परंतु कैलास अग्रवाल याला न्यायालयातून जमानत मंजूर करण्यात यश मिळाल्यामूळे कोळसा तस्करांच्या हिंमतीत वाढ झाली आहे. नागाडा कोळसा टालावरील चोरी प्रकरणाची शाई ओली असतानाच गुजरात येथील अहमदाबाद काठीयावड कोल व गुजरात कोल च्या माध्यमातुन सबसिडीच्या कोळसा खुलेआम पडोली च्या टालावर मोठ्या प्रमाणात उतरवण्यात आला. वेकोली प्रशासनाच्या नियमाला धाब्यावर बसवून कोळसा तस्कर सरकारी संपत्तीची खुलेआम चोरी करून करोडो रूपये कमवित आहे.
वेकोली प्रशासनाच्या नियमाला बघितले असता हा पूर्ण कारभार चोर मार्गाने होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्या उद्योगांना सबसिडीचा कोळसा दिला जातो, तो सरळ त्या-त्या उद्योगांपर्यंत पोहोचायला हवा नागाडा किंवा पडोली कोल डेपोवर तो उतरविला कसा जातो हा संशोधनाचा व कारवाईचा विषय आहे. या चोरीच्या व्यवसायात सगळ्या चोरांनी आता एका ठिकाणी येऊन नवीन मार्ग शोधला आहे. चंद्रपूर ही कोळशाची जननी आहे. कोळसा तस्करीच्या व्यवसायात अनेक व्यवसाई आता सक्रिय झाले आहेत. सबसिडीच्या कोळसा ज्या चोर मार्गाने तळापर्यंत पोहोचतो त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून शोध केल्यास मोठे घबाड चंद्रपुरात उघडकीस येऊ शकते. प्रामाणिक कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याची यासाठी आवश्यकता आहे.
0 टिप्पण्या