चंद्रपूर शहरात आजपासून शहरातील काही भाग सील करण्यात येतं असल्यामुळे अफवांना पेव फुटत असून घाबरण्याचे काहीच कारण नाही, चंद्रपुरात अद्याप एकही रुग्ण मिळाला नसून सुरक्षितता म्हणून शासनाच्या वतीने या उपाययोजना केल्या जात आहे. शहरातील प्रत्येक एरियामध्ये सील करून त्याठिकाणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कुटुंबाची चौकशी केली जात असून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला रोजच्या रोज देण्यात येणार आहे. चंद्रपुरातील भिवापुर वार्ड, महाकाली मंदिर परिसर, हनुमान नगर, तुकूम, इंदिरानगर, महाकाली काॅलरी हा परिसर आज सील करण्यात आला असून त्या ठिकाणी पोलिसांचा पहारा बसविण्यात आला आहे. पोलिसांच्या माॅक ड्रील हा प्रकार असून घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा आरोग्य तपासणीसाठी चा हा एक भाग असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवता सहकार्य करावे, हा एक महत्त्वाचा विषय आहे, जनतेमध्ये यामुळे विविध अफवांनी पेव फुटले असून घाबरण्याचे काहीही कारण नाही, चंद्रपुरात कोरोणाच्या रुग्ण नाही यासाठी खबरदारी आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य ते सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. उद्या दिनांक 26 रोजी एकोरी वार्ड, रहमतनगर या परिसरात ही तपासणी होणार आहे अशी माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे.
0 टिप्पण्या