चंद्रपुरला धोका तेलंगणाचा! तेलंगणातील "ते" सोळा मजुर चंद्रपूरात "क्वारनटाईन"!

   
   
  आज रविवार दिनांक 26 रोजी तेलंगणा हैदराबाद येथून  छत्तीसगड येथील बालाघाट येथे जाणाऱ्या 16 ते 17 मजुरांना पठाणपुरा गेट जवळ पकडून क्वारनटाईन करण्यात आले. तेलंगणातुन चंद्रपुरात येणाऱ्या मजूर तथा अन्य लोकांची संख्या ही धोकादायक आहे. यापूर्वी 23 तारखेला तेलंगणातील सिमेंट ने भरलेला चार चाकी ट्रक केसलाघाट मारुती मंदिरजवळ पलटी झाला. यात तेलंगणातील बालाघाट येथे जाणारे मजदूर जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास मुल पोलीस स्टेशन येथे आहे व जखमी झालेले मजूर चंद्रपूरच्या रुग्णालयात क्वारनटाईन करण्यात आले आहे. आज घडलेल्या घटनेत मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार हे मजूर 22 तारखेपासून निघाले होते. तेलंगाना येथे त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे उपासमारीच्या भितीने त्यांनी त्याठिकाणाहून मार्गाने पलायन केले असल्याचे ते सांगत होते. या मजुरां सोबत महिला, लहान मुले, सामानांचे गठडे होते. परराज्यातून व परजिल्ह्यातून "ग्रीन झोन" असलेल्या चंद्रपुरात दाखल होणाऱ्यांची संख्या यांवर योग्य उपाययोजना न केल्यास धोका चंद्रपूर साठी घातक ठरू शकतो. चंद्रपूर चे जिल्हाधिकारी याविषयी वारंवार सूचना व आव्हाने देत असतात. सीमा वर असलेली नाका-बंदी, आजूबाजूच्या क्षेत्रात असलेला पहारा या सर्वांना तोडून मजूर जिल्ह्यात प्रवेश कसे काय करीत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. तेलंगणातून सिमेमध्ये प्रवेश करताक्षणीचं त्यांना क्वारनटाईन करण्यात यायला हवे, प्रवेश करणार्या या मजूर पैकी एकही मजूर कोरोना बाधिताच्या संपर्कात ही आला असेल तर जिल्ह्याची परिस्थिती काय राहील याचा विचार न केलेलाच बरा!

 आज चंद्रपुरातील पठाणपुरा येथील मंदिराजवळ चोर मार्गाने येतांना काही मजदुरांना सुज्ञ नागरिकांनी थांबविले. विचारपूस केली असता हे मजदूर तेलंगणातील हैदराबाद येथून पायदळ प्रवास करीत चंद्रपूरला धडकले होते. त्यांचे सोबत महिला व लहान मुले होती. त्यांना हीवरपुरी च्या हनुमान मंदिरापाशी थांबवून आरोग्य तपासणी करून या 14 जणांना चंद्रपूरातील फुले प्राथमिक शाळेत क्वारनटाईन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तेलंगानातुन चंद्रपूर कडे येणार्या मजूरांचा लोंढा येणाऱ्या काळात चंद्रपूर साठी धोक्याचे ठरू शकते. महामार्गावर होणारी कडक तपासणीतून मार्ग काढीत या मजुरांना चोर मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ही चंद्रपूर साठी धोक्याची घंटा आहे. नुकतेच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यामध्ये परराज्यातून येणाऱ्या तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची  माहिती प्रशासनाला द्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे. 

  चंद्रपुरात मुख्य मार्गावर असलेली लागलेले बॅरिकेट्स, कठडे हे सगळेच चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी आहेत. चंद्रपूर करांनी घरातच राहून लाॅकडाऊन च्या आदेशाचे पूर्ण पालन केले आहे व करीत आहे. परंतु बाहेरून येणारा मजुरांचा लोंढा आता थांबून ही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे. हे मजूर नागरिकांच्या सतर्कतेने कोरोनटाईन होता आहे, त्यांचे ठीक पण जे मजूर जिल्ह्यातून प्रवेश करून समोर जात आहे त्यांचे काय? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या