चंद्रपूर, दि.14 मे : लॉकडाऊनच्या काळामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातून बाहेर अर्थात आपल्या राज्यात, जिल्ह्यात स्वगावी गेलेले 14 हजार 118 नागरीक आहे. तर बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 57 हजार 814 नागरीक परवानगीने स्वगावी आलेले आहे. जिल्हा प्रशासनातील 1 हजार 206अधिकारी-कर्मचारी यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.या नागरिकांमध्ये बहुसंख्येने मजूर आहेत. विद्यार्थी, प्रवासी, उद्योग, व्यवसायी व विविध खाजगी आस्थापनेवरील कामगार कर्मचारी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन केले आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वत्र बंद असल्याकारणाने बाहेर राज्यातील, जिल्ह्यातील अनेक नागरीक चंद्रपूर जिल्ह्यात अडकलेले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात बाहेर राज्यात, जिल्ह्यात नागरीक अडकलेले आहे. या सर्व नागरीकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनामार्फत परवानगी देवून त्यांना स्वगावी जाण्यासाठी मदत होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तब्बल 24 तास काम करत आहे.
जिल्ह्यातून स्वगावी गेलेले नागरिक : 12 मे पर्यंत रेल्वेने बिहार राज्यात 613, उत्तर प्रदेश राज्यात 488 असे एकूण 1 हजार 101नागरीक स्वगावी गेलेले आहेत. विविध मार्गाने जसे बस,जीप, ट्रकनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 374, छत्तीसगड 1 हजार 210, राजस्थान 79, आंध्रप्रदेश 12, झारखंड 58,बिहार 59, उत्तर प्रदेश 176, मध्यप्रदेश 506, इतर राज्यात 24 असे एकूण 2 हजार 498 नागरीक स्वगावी गेलेले आहेत. मॅन्युअली पास निर्गमित करून (इशू ऑफलाइन पासेस) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 2 हजार 739, छत्तीसगड 1 हजार 230, राजस्थान202, तेलंगाना 241, आंध्र प्रदेश 59, झारखंड 157, बिहार 539, उत्तर प्रदेश 850, मध्यप्रदेश 682 तर इतर राज्यात 265 असे एकूण 6 हजार 964 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.
ई- पास (ऑनलाइन पास इशू) काढून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 251, छत्तीसगड7, राजस्थान 2, तेलंगाना 9, झारखंड 2, बिहार 3, उत्तर प्रदेश 2, मध्यप्रदेश 2, इतर राज्यात 8 असे एकूण 286 नागरीक स्वगावी गेलेले आहेत. मात्र,14 मे पर्यंत एकुण 14 हजार 118 नागरिक स्वगावी गेलेले आहे.
जिल्ह्यात स्वगावी आलेले नागरिक : 12 मे पर्यंत रेल्वेने तेलंगानातून 1 हजार 729नागरीक जिल्ह्यात स्वगावी आलेले आहेत. तसेच विविध मार्गाने जसे बस, जीप, ट्रक यामधून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 329, तेलंगाना 45हजार 303, असे एकूण 45 हजार 632 नागरीक जिल्ह्यात स्वगावी परत आलेले आहेत. ई- पास (ऑनलाइन पास इशू) काढून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 2 हजार 366 नागरीक स्वगावी परत आलेले आहेत. तर लेखी परवानगीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 9 नागरीक परत आलेले आहेत. मात्र, 14 मे पर्यंत एकुण 57 हजार 814 नागरिक जिह्यात परत आले आहे.
1 हजारावर अधिकारी कर्मचारी कार्यरत : लॉकडाऊन मध्ये अडकलेले नागरीक हे त्यांच्या मूळ गावी जावे यासाठी जिल्हा प्रशासनातील तब्बल 1 हजार 206 अधिकारी-कर्मचारी दिवसातून 12 ते 14 तास अविरत झटत आहेत. या सर्वांचा एकच उद्देश म्हणजे जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित त्यांना स्वगावी परत पोहोचविणे हा आहे.
संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात आलेल्या व जिल्ह्याबाहेर गेलेल्या नागरीकांची संपूर्ण खबरदारी घेतल्या जाते तसेच या सर्वांचा लेखाजोखा एकत्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
कोरोना विरुध्दच्या लढ्यामध्ये प्रशासनाचे असंख्य अधिकारी, कर्मचारी आपली भुमिका पार पाडत आहेत.आपण सर्वांनी यांना कृतज्ञता म्हणून घरात राहुन साथ देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या