चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे २४ मे रोजी सकाळी १९ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी २१ झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सायंकाळी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हे दोन्ही रुग्ण दाखल आहेत.
नव्याने पॉझिटिव ठरलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहे
१. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवक 11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम कॉरेन्टाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
२. दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.
हे दोन नवीन रुग्ण आज 24 मे रोजी पॉझिटिव्ह ठरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २१ झाले आहेत.
जिल्हा प्रशासनासोबत कोविड विरुद्धच्या
चंद्रपूर, दि. 24 मे: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविल्या जात आहे. आता जिल्हा प्रशासना सोबत कोरोना विरुद्धच्या युद्धात जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यांना होता येणार सहभागी:
जिल्ह्यातील डॉक्टर, प्रशिक्षित पॅरामेडिक, पॅलीएटीव्ह केअर, हॉस्पिटल मॅनेजमेंट एक्सपर्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, योगा ट्रेनर, डिजिटल कंटेंट क्रियेटर (ऍनिमेशन,मूवी मेकिंग), फिटनेस ट्रेनर, टेली कॉलिंग प्रोफेशनल, इव्हेंट मॅनेजर, सप्लाय चेन, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, वेअर हाऊसिंग, सायकॅट्रिक कौन्सिलिंग एक्सपर्ट, जनरल स्वयंसेवक, स्वयंपाकी इत्यादींना कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सहभागी होऊ शकता.तसेच,मास्क, सॅनिटायजर आणि इतर पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट तयार करण्यासाठी सुद्धा स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
सहभागी होण्यासाठी संपर्क करा:
स्वयंसेवकांनी सहभागी होण्यासाठी chanda.nic.inया संकेतस्थळाला भेट देवून होम पेजवरील इन्डीवीजवल वालेन्टीअर या नावाचे चित्रावरील जॉइन नाऊ यावर क्लिक करा त्यानंतर गुगल फॉर्म उघडल्या जाईल. या गुगल फॉर्म वर सविस्तर माहीती भरा आणि फॉर्म सबमिट करा.या संबंधित काही अडचण असल्यास 9448258862 या क्रमांकावर तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 07172-251597,272480 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.
0 टिप्पण्या