जिल्ह्यात 31 मे पर्यंत "लाॅकडाऊन", 5 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी!



  • कृष्णनगर मधील प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध आजपासून शिथील
  • जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी आणि 7 ते 5 सुरू राहतील
  • अन्य सर्व दुकाने सोमवार ते शनिवार 10 ते 5 सुरु राहतील
  • बिनबा गेट परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात सर्व आस्थापना बंद
  • जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही
  • दुचाकी-चारचाकी ,रिक्षा, ऑटो रिक्षा यांना सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाहतूक प्रतिबंधित
  • ऑटो मध्ये 2 प्रवाशांना वाहतुकीस परवानगी
  • सर्व शासकीय आस्थापना सुरू; शंभर टक्के उपस्थिती आवश्यक
  • लग्नसमारंभासाठी फक्त 50 लोकांना परवानगी
  • अंत्यविधीसाठी शारीरिक अंतर राखून 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी
  • शेतीविषयक सर्व कामांसाठी परवानगी, कृषी केंद्रांना 10 ते 5 अनुमति
  • धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध कायम
  • सार्वजनिक स्थळी 5 किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये
  • आंतर जिल्हा, आंतरराज्यीय विनापरवाना वाहतुकीला बंदी

चंद्रपूर, दि. 17 मे : केंद्र व राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे कोरोनाचे सावट अद्यापही कायम असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 31 मे पर्यंत जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या काळामध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. मात्र अन्य काळात आवश्यकता असेल तरच घरातील एका व्यक्तीने बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्या 18 मे पासून जीवनावश्यक वस्तूंची अन्य दुकाने देखील उघडली जाणार आहेत. जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र आंतरराज्य व आंतर जिल्ह्यांमध्ये प्रवासाला बंदी कायम असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जारी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायंकाळी यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे उद्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता जारी केली आहे.

तथापि, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील चंद्रपूर शहरांमध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या कृष्ण नगर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे हटविण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना आता अन्य जिल्ह्याप्रमाणे लॉकडाऊनचे नियम लागू राहतील. मात्र बिनबा गेट परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना ही मोकळीक मिळणार नाही.

उद्या 18 मे पासून तर पुढील 31 मे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 ( 1 ) ( 3 ) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये तरतुदीची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नुसार उद्या 18 मे पासून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी आणि 7 ते 5 सुरू राहतील,अन्य सर्व दुकाने व्यापारी प्रतिष्ठाने सोमवार ते शनिवार 10 ते 5 सुरु राहतील. मात्र दुकानदारांनी गर्दी होऊ देऊ नये तसेच नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे अन्यथा त्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल. याशिवाय मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक व कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. हे नागरिक बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांना 2 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. दुचाकी-चारचाकी, रिक्षा, ऑटो रिक्षा यांना दिवसा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.उमात्र सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाहतूक प्रतिबंधित आहे.ऑटो मध्ये 2 प्रवाशांना वाहतुकीस परवानगी आहे. चारचाकी वाहनांमध्ये केवळ 2 प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सॅनीटायझर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. दुचाकीवर केवळ दुचाकी चालकाला चालविण्याची परवानगी असेल. डबलसीट परवानगी नाही.

सर्व शासकीय आस्थापना शंभर टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना व वसाहती, युनिट, सुरू राहतील. लग्नसमारंभासाठी फक्त 50 लोकांना परवानगी असेल, अंत्यविधीसाठी शारीरिक अंतर राखून 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी दिली जाईल. शेतीविषयक सर्व कामांसाठी परवानगी असून कृषी केंद्रांना 10 ते 5 अनुमति राहील.

धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध कायम आहे. सार्वजनिक स्थळी 5 किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.आंतर जिल्हा आंतरराज्यीय विनापरवाना वाहतुकीला बंदी घालण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या