सेवादिनी भाजपातर्फे जिल्ह्यात 455 नागरिकांनी केले रक्‍तदान !



  • अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची संकल्‍पना!

  • पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांची जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वर्षपूर्तीनिमीत्‍त चंद्रपूर जिल्‍हयात रक्‍तदान शिबीर

चंद्रपूर : पुण्‍यश्‍लोक राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांची जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या दुस-या टर्मची वर्षपूर्ती यांचे औचित्‍य साधत चंद्रपूर जिल्‍हयात भाजपातर्फे सर्व तालुका स्‍तरावर रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. पुण्‍यश्‍लोक राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांनी निरंतर समाजसेवा करत सेवेचा मंत्र दिला. अहिल्‍यादेवी होळकर यांचा सेवेचा मंत्र पुढे नेत आपल्‍या लोककार्याच्‍या माध्‍यमातुन देशाची निरंतर सेवा करणारे प्रधानसेवक पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या सरकारच्‍या वर्षपूर्ती निमीत्‍त आत्‍मनिर्भर भारताच्‍या त्‍यांच्‍या स्‍वप्‍नाला साकार करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हयातील 455 नागरिकांनी करत रक्‍तदान केले. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन हे रक्‍तदान शिबीर जिल्‍हाभर आयोजित करण्‍यात आले.
या रक्‍तदान शिबीरामध्‍ये बल्‍लारपूर शहरात 30, वरोरा येथे 40, दुर्गापूर येथे 20, चिमूर येथे 51, मुल येथे 30, कोरपना येथे 15, गोंडपिपरी येथे 25, पोंभुर्णा येथे 40, पडोली येथील 30, सिंदेवाही येथे 50, सावली येथे 35, ब्रम्‍हपूरी येथे 40 तर नागभीड येथे 35 नागरिकांनी रक्‍तदान करत पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांना अभिवादन केले व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वर्षपूर्तीनिमीत्‍त शुभेच्‍छा दिल्‍या.
या रक्‍तदान शिबीरात माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, जिल्‍हा भाजपाचे सरचिटणीस देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, जिल्‍हा भाजपाचे सरचिटणीस संजय गजपूरे, राजेश मून, राहूल सराफ, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्ष सौ. रेणुका दुधे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष ब्रिजभूषण पाझारे, रक्‍तदान शिबीर संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे, राहूल पावडे, प्रकाश धारणे, सौ. मिना चौधरी, काशी सिंह, राजु गुडेटी, अलका आत्राम, ज्‍योती बुरांडे, गजानन गोरंटीवार, राहूल संतोषवार, श्‍वेता वनकर, रजिया कुरेशी, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, सुभाष कासनगोट्टूवार, रत्‍नमाला भोयर, नंदू रणदिवे, किशोर पंदिलवार, अविनाश पाल, हनुमान काकडे, नामदेव डाहूले, राजू बोरकर, भगवान गायकवाड, सुरेश महाजन, प्रविण सातपुते, तुळशिराम श्रीरामे, केशवराव गिरमाजी, बबन निकोडे, सुनिल उरकुडे, होमदेव मेश्राम, दिलीप शिवरकर, नागराज गेडाम, डॉ. श्‍याम हटवादे, संतोष रडके, बाळू नंदूरकर, मनोज वठे, मनोज भुपाल, डॉ. उमाजी हिरे, गणेश तर्वेकर, निलम राचलवार, रितेश अलमस्‍त, सतिश बोम्‍मावार, राजकुमार आकापेल्‍ली आदींनी परिश्रम घेत सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या