बाहेर निघा यातून... "Only admin can send messages"!



(विशेष वार्ता : दिसलं तसचं लिहीलं..)

मागील काही महिन्यापासून "Only admin can send messages" असा मेसेज बऱ्याचश्या व्हाट्सअप ग्रुप वर बघायला मिळत आहे. काय आहे यातील सत्य हे शोधण्याचा प्रयत्न केला असता समोर आलेली माहिती विचीत्र आहे. संचारबंदी नंतर "कोरोना" च्या पार्श्वभुमीवर संवेदनशीलता बघता प्रशासनाने चुकीचे संदेश (msg.) जाऊ नये यासाठी प्रत्येक व्हाट्सअप ग्रुप एडमिन ने याची सावधानता बाळगावी यासाठी एडमिन आणि creater वर ग्रुप वर चुकीचे मेसेज फॉरवर्ड झाल्यास गुन्हे दाखल होतील अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर बहुतेक व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ने तो ग्रुप फक्त ॲडमिन (admin) पूरता वापरात ठेवला आहे. अशाच काही ग्रुप admin च्या संवेदनशीलतेची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता ग्रुप ॲडमिन हा फारच विद्वान किंवा संवेदनशील आहे अपवाद वगळता असे नाही. मग चार-पाच ग्रुप एडमिन असलेले व जवळपास शंभर पेक्षा जास्त सदस्य असलेल्या WhatsApp ग्रुपला group एडमिन आपले विचार, आपलीच मते सदस्यांच्या माथी थोपवत असल्याचे बहुतेक ग्रुप मध्ये दिसले. चुकीच्या संदेशावर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार ही जर त्या सदस्याला नसेल, किंवा ग्रुपवर आलेली माहिती "संच की झुठ" हे विचारण्याची संधी ही सदस्याला मिळत नसेल तर आपले त्या ग्रुप मधील अस्तित्व काय? याचा विचार व्हायलाचं हवा. एडमिन नी सांगायचे आणि सदस्यांनी वाचायचे-बघायचे, का बरं असे व्हावे? प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. एखाद्या ठिकाणी चूक पण होऊ शकते, त्याविषयी एडमिनने त्या सदस्याला समज द्यायला हवी, न ऐकल्यास group मधून remove करायचा अधिकार admin ला आहे. मग असे न करता मागील कितीतरी महिन्यांपासून 2-4 एडमिन च्या भरवशावर हे व्हाट्सअप ग्रुप सुरू आहेत. एखाद्या शाळेचा हेडमास्तर विद्यार्थ्यांना ज्ञान देतो त्याच पद्धतीने आज काही व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुरू आहे. कुठेतरी बंद व्हायला हवे म्हणून "Only admin can send messages"! असे ज्या ग्रुप मध्ये लिहिले आहे, त्या ग्रुपमध्ये असलेल्या सुज्ञ सदस्यांनी ग्रुप ॲडमीन ला तो ग्रुप सगळ्यांसाठी खुला करायला सांगून ही जर ग्रुप ॲडमिन समजत नसेल तर स्वतःच त्या group ला राम-राम ठोकलेले केंव्हा ही बरे आहे, मी पण आज अश्या 25-30 व्हाटस् अॅप ग्रुप ला निरोप दिला आहे, म्हणून सोशल मिडीया प्रेमींसाठी दोन शब्द पाझरवित आहे. "बाहेर निघा यातून..." एवढेचं....! बंधन नाही, विचार आपापले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य साऱ्यांना आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या