"ग्रीन-ऑरेंज" असा चंद्रपूर जिल्ह्याचा झोल !

 


   चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याचे शुक्रवार दि. १ में रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला आहे. "ग्रीन-आॅरेज" झोनच्या झोल कसा होत आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. भारतात पुन्हा लाॅक डाऊन वाढेल, असे नुकतेच घोषित करण्यात आले, त्यामुळे चंद्रपूरकरांमध्ये धास्ती वाढली आहे. चंद्रपूर  जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूर येथे चंद्रपूर मूळ नागरिक असणारे विदेशातील 2 नागरिक पॉझिटिव्ह आले होते ते नागरिक धोक्याबाहेर असून सध्या नागपूर येथे उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अद्याप तसा कोणताही अहवाल कोणाचा आलेला नाही राज्य शासनाच्या काही वेबसाईटवर नागपूर मध्ये असलेल्या या रुग्णांचा चंद्रपूर शहराच्या नावावर उल्लेख दाखविण्यात येतो मात्र हा उल्लेख चुकीचा असून चंद्रपूर जिल्हा एकही रुग्ण नसलेला जिल्हा आहे असा खुलासा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केला असला तरी जिल्ह्यावासी आता मात्र बेचैन झाले आहेत. भारत सरकारच्या covid-19 या लिंकवर, तसेच भारत सरकारच्या स्वास्थ्य एवं परिवार परिवार कल्याण विभाग परिवार कल्याण मंत्रालय व एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या 30 एप्रिल रोजी निघालेल्या पत्रकामध्ये स्पष्टपणे चंद्रपूर जिल्हा अर्जुन मध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिल्हानिहाय दिलेल्या आकडेवारीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले असून जिल्हा व मनपा अशी वर्गवारी याठिकाणी करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरचे नसलेले 2 रूग्ण पकडून एकंदर 30 एप्रिल पर्यंत 10,498 बाधित रुग्ण असल्याचे शासकीय आकडेवारी आहे जिल्हा-मनपा निहाय या आकडेवारीत चंद्रपूर मनपा मध्ये दोन बाधित रुग्णांची नोंद दाखविण्यात आली असल्यामुळे ही खळबळ सहाजिकच आहे. महाराष्ट्रात झोनिंग चुकीचे झाल्यामुळे याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क करून केंद्राजवळ हा विषय उचलण्याची प्रक्रिया सुरू असून चंद्रपुरात एकही रुग्ण नसताना तो ऑरेंजमध्ये आहे. तसेच अकोला रेड झोनमध्ये असणे, अमरावती, बुलढाण्यात जास्त केसेस असताना ते रेड मध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे इत्यादी विषय केंद्र सरकार समोर मांडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नाम.  विजय वडेट्टीवार यांनी म्हटल्याचे वृत्त ऐकण्यात-वाचण्यात येत आहे. ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांना तीन में अंतर शिथीलता देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे परंतु ग्रीन ऑरेंज झोनच्या झोलमध्ये जर चंद्रपूरला वगळण्यात आले तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.
   दररोज आरोग्य विभागात तपासणीसाठी येणारे रुग्ण, क्वारनटाईन करण्यात येणारे रुग्ण, संशयित रुग्ण यांची अधिकृत आकडेवारी जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर केली जात आहे. मुल येथील ते बाधित रुग्ण आता बरे झाले असून त्यांचा पत्ता तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर असा असल्यामुळे त्यांची मोजणी जिल्ह्यात करण्यात येत असल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते. रोजच्या रोज जिल्ह्याकडून आरोग्य विभागाकडे जाणारी या आकडेवारीच्या आधारावर रुग्णांची नोंद केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मग रुग्ण नसतानाही जिल्हा ऑरेंज झोन कसा? हा कळीचा मुद्दा आहे. केंद्र शासनाने आरोग्य सेतू ॲप प्रत्येकांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करण्याचे सूचना दिल्या आहेत. हा ॲप डाऊनलोड केल्यानंतर काही सामान्य प्रश्न भरून त्याठिकाणी नोंद होत आहे, काही सोशल मीडिया विद्वानांच्या मते या ॲपमध्ये काहीतरी झोल झाल्यामुळे जिल्ह्याला ग्रीन मधून ऑरेंज मध्ये दाखवावे लागत असल्याची अफवाही मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर त्वरित काय तो मार्ग निघायला हवा अन्यथा बोंबला रे बोंबला अशी स्थिती चंद्रपूरकरांची होणार नाही, अशीच अपेक्षा यानिमित्त जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून चंद्रपूर जिल्हावासी करू शकतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या