माहिती देण्यास गडचांदूर न.प. ची टाळाटाळ!
(गडचांदूर विशेष) : गडचांदुर मध्ये मंगळवार दिनांक 14 मे रोजी बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू ची खुलेआम सुरू असलेली विक्री यावर "विदर्भ आठवडी" ने वृत्ताच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता, त्यानंतर त्याच दिवशी गडचांदुर नगर परिषद प्रशासनाने शहरातील प्रतिष्ठित असलेल्या एका व्यापाऱ्यावर कारवाई केली. या कारवाई संदर्भात माहिती मिळावी यासाठी गडचांदुर न.प. चे सेल्स इंस्पेक्टर प्रमोद वाघमारे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी कुणावर कारवाई केली? काय गुन्हा दाखल केला? किती सुगंधित तंबाखू जप्त केला? ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. वाघमारे यांना मेसेज केला तो त्यांनी अटेंड केला. फोन केला त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये आहे असे सांगितले, अर्ध्या तासांनी आपणच फोन करणार असल्याचे सांगून माहिती मिळेल अशी "तंबी" दिली, त्यानंतर घरी जेवण करीत आहे अशी दुसरी "तंबी" दिली, त्यानंतर सीओ साहेबांना विचारावा लागेल अशी तिसरी "तंबी" दिली. कारवाई केली मग अशा "तंबी" कां बरे दिल्या जात आहे, यासाठी सदर कारवाई ची माहिती मिळावी यासाठी बुधवार दिनांक 6 मे रोजी गडचांदुर च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेरकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "वाघमारे यांच्याकडे भरपूर काम आहे. कोरोना चे सॅनिटायझर वाटणे आहे, त्यासोबतचं अन्य भरपूर कामे वाघमारे यांचेकडे असल्याचे सांगून आत्ता ते इन्स्पेक्शनसाठी गेल्याचे सांगितले." व फक्त आम्हीच कामात आहोत, बाकी सगळे रिकामटवळे असल्याच्या आविर्भाव दाखविला. परंतु कारवाई कुणावर केली व अन्य माहिती देण्यात मात्र त्यांनी वरिष्ठ जबाबदार अधिकारी या नात्याने पुढाकार दाखविला नाही. सेल्स इंस्पेक्टर प्रमोद वाघमारे यांनीही यासंदर्भात दाखविलेली दिरंगाई बरीच बोलकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर येथे 4 मे रोजी नगरपरिषदेशी संबंधित असलेल्या एका मोठ्या व्यापार्यावर सुगंधित तंबाखू विक्रीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत 50,000 च्या जवळपास सुगंधी तंबाखू रंगेहात पकडण्यात आला. सदर प्रकरणात पकडण्यात आलेला बंदी असलेला तंबाखू चा अवैध व्यापार हा गडचांदुर नगर परिषदेशी कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक संपर्कात राहिलेले मोठे व्यापारीचं हा व्यवसाय आज गडचांदूरात जोरात करत आहेत. त्यातीलच एकावर ही कारवाई करण्यात आली. ज्यांच्यावर कारवाई करण्यात आले, त्यांना बाजूला सारून एका "डमी" वर हा गुन्हा दाखवण्याचा कट सुरू आहे. मुख्य प्रतिष्ठीत (?) आरोपीला मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. जर कारवाई केली तर त्याची माहिती माध्यमांना पारदर्शकपणे मिळायला हवी. स्वतः याची प्रेसनोट काढून अशी कारवाई करण्यात आल्याचे दाखविण्यात यायला हवे. आम्हाला कामाचा व्याप आहे हे याचे उत्तर नाही. कारवाई केली मग त्याची माहिती संबंधित वरिष्ठ विभागाला दिली कां? अन्न व प्रशासन विभागाला याची माहिती मिळायलाच हवी.
फक्त आम्हीच कामात आहोत, बाकी सगळे रिकामटवळे असल्याच्या आविर्भाव दाखविला. परंतु कारवाई कुणावर केली व अन्य माहिती देण्यात मात्र त्यांनी वरिष्ठ जबाबदार अधिकारी या नात्याने पुढाकार दाखविला नाही. सेल्स इंस्पेक्टर प्रमोद वाघमारे यांनीही यासंदर्भात दाखविलेली दिरंगाई बरीच बोलकी आहे.
कामाचा व्याप कितीही असला तरी जबाबदारी झटकता येत नाही, हे या ताण-तणावाच्या वेळेसही चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून शिकण्यासारखे आहे.
कोरोना च्या आलेल्या संकटाने सारेच हतबल झाले आहे. फक्त चोरट्यांनी मात्र आपले व्यवसाय सुरु ठेवले आहेत. कोळसा, रेती, बंदी असलेल्या तंबाखूची तस्करी ही जशीच्या तशी सुरू आहे. गडचांदुर मध्ये तर संचारबंदी मध्ये गडचंदुर पोलिसांनी हाय प्रोफाईल च्या अवैध दारूचा साठा पकडला, संचार बंदीनंतर सगळ्यात मोठी झालेली ही कारवाई होती, त्यानंतर काय झाले हा संशोधनाचा विषय आहे. हे फक्त आपल्या जिल्ह्यातील उदाहरण नाही संपूर्ण महाराष्ट्र असे अनेक प्रकरण बघायला मिळतात. नुकतेच यवतमाळमध्ये "खर्रा" मुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी मीडियासमोर सांगितले होते.
गडचांदूर मध्ये बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू प्रतिष्ठित समजले जाणारे काही विशिष्ट वर्गाचे व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत. अव्वाच्या सव्वा दराने जहरीला तंबाखू विकल्या जात आहे. शौकीन त्याच्या आस्वादही घेत आहे. अशा गैरप्रकारावर आळा बसून कडक कारवाई करण्याची जबाबदारी ही त्या-त्या विभागाची आहे, हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. जेमतेम 40 हजार लोकवस्ती असलेले गडचांदूर शहर, चांगल्या व वाईट कामासाठी या शहराची ओळख आहे. अधिकाऱ्यांशी व नेत्यांशी जवळीक साधून गैरकमाईने आपले पोट भरणारे याठिकाणी "लई" आहेत. आतापावेतो या शहरांमध्ये आलेल्या अधिकाऱ्यांशी साठ-गांठ करून आपली पोटरी मोठी करणारे अनेक झालेत. आता बालवयात असलेली गडचांदुर नगर परिषद अनेक आरोपांनी घेरली आहे. फक्त छोट्या व्यावसायिकांवर आपला रोब दाखवून शिस्त लावीत आहो हे दाखविणे म्हणजे कर्तव्य नये. "गरिबांवर कायद्याचा रोब दाखवायचा आणि अमिरांचे तळवे चाटायचे." हे धोरण बंद व्हायला हवे. मागील काही दिवसापासून बंद असलेल्या फळ विक्रेत्यांची, भाजी विक्रेत्यांची बंद दुकाने हटविण्याची मोहीम हाती घेतल्याचे ऐकण्यात येत आहे. पूर्वीच संचार बंदी गरिबासाठी त्रासदी झाली आहे, त्यात त्यांची रस्त्यावरील बंद दुकाने उचलून "अतिक्रमण हटाव मोहीम" न.प. राबवित असल्याचे ऐकविण्यात येत आहे, हा कोणता न्याय आहे, यांचा जाब जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचांदूर न.प. च्या जबाबदार अधिकाऱ्यांना अवश्य विचारायला हवा. तसेच गडचांदूरमध्ये सुगंधित तंबाखू विक्रीवर झालेल्या कारवाई ची माहिती माध्यमांना प्राप्त करून देण्यास गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेरकी यांनी अवश्य पुढाकार घ्यायला हवा.
0 टिप्पण्या