"ते" वृत्त अधिकृत नाही, नांदेडच्या "त्या" चालकांचा रिपोर्ट अद्याप आलाच नाही!

 



अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन! 
त्या इसमांची रिपोर्ट अजून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही
 त्या तीनही युवकांना नांदेड प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले

(चंद्रपूर विशेष) : आज चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन व्यक्तींना कोरोना असल्याचे वृत्त काही ठिकाणी झळकले,  त्यामुळे चंद्रपूरमध्ये खळबळ माजली होती. परंतु सदर वृत्त निराधार असून नांदेड मधून आलेल्या त्या इसमांची रिपोर्ट अजून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नसून नांदेड मधील फरार युवकांच्या व या युवकांच्या नावांमध्ये तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,  असे आव्हान जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  चंद्रपूरमध्ये सध्या कृष्ण नगर येथे मिळाला एकच कोरोरना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यालाही नागपूर येथे शिफ्ट करण्यात आले आहे.

  सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दिनांक ६ मे रोजी गडचांदूर येथून नांदेडच्या तिन लोकांना पकडून चंद्रपूर येथे आणण्यात आले. हे नांदेड येथील गुरुद्वारा मधून पळून आलेले असावे या अंदाजाने व माहितीनुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. नांदेडच्या तीनही लोकांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनटाईन करण्यात आले असून त्यांच्या अहवाल अजून शासनाला प्राप्त झालेला नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या तीनही युवकांना नांदेड प्रशासनाच्या ताब्यात देण्यात देण्यात आले असून पळून गेलेले युवक व चंद्रपूरातील हे युवक याची पडताळणी आता नांदेड जिल्हा प्रशासन करणार आहे. तरीही कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत बातमीला सत्य समजावे, अशा आशयाची प्रेस नोट पोलिस प्रशासनातर्फे आज काढण्यात आली आहे. 
 विशेष म्हणजे नांदेड येथील गुरूद्वारा मध्ये काही लोकांना कोरोनटाईन करण्यात आले होते. नांदेड येथे कोरोनटाईन असलेल्या लोकांना पंजाब मध्ये हलवल्यानंतर त्याठिकाणी बहुतेक रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे पंजाब सरकार पुर्णतः हादरली आहे. त्याच गुरुद्वारामधून चार लोकांनी पळ काढल्याचे व त्यांच्याविरोधात नांदेड येथील वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या चार मधील हे तिन चालक असल्याची अफवा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली आहे. 

 आज दुपार ला काही वृत्तामध्ये नांदेड वरून आलेले हे तीनही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या व हे रुग्ण असून त्यांच्या संपर्कात जे-जे आलेत त्यांचे काय? ते नांदेड वरून येथे आले कसे ? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महत्त्वाचे म्हणजे पळून गेलेल्या इसमांची नावे जिल्ह्यातील त्यात तीन येऊ का सोबत मिळत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. परंतु या बातम्या निराधार असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे जिल्हावासियांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही. नांदेड मधून आलेल्या त्या तीनही चालकांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनटाईन करण्यात आले असून त्यांच्या रिपोर्ट अद्याप प्राप्त व्हायचा आहे.  चंद्रपुरातील आतापावेतो पाठविण्यात आलेले सगळेच रिपोर्ट हे निगेटिव आल्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हा दिलासा देणारा विषय आहे.  अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे व शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. 

 यासंदर्भात बोलताना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी योग्य को-ऑर्डिनेशन रहावे यासाठी डॉ.राज गहलोत यांची नियुक्ती करण्यात येत असून कोरोना शी संबंधित अधिकृत माहिती डॉ. गहलोत यांचेकडून मिळू शकेल असे सांगितले. सदर बाबतीत विचारणा केली असता गहलोत यांनी याला दुजोरा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या