- जळालेला कोळसा पडल्याने गंभीर अपघात!
- कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे झाला अपघात !
- एका कामगारांची प्रकृती चिंताजनक!
(चंद्रपूर वि. प्रतिनिधी)
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मागील अनेक वर्षापासून ठेकेदारी करणाऱ्या अडोरे या कंत्राटदारांला क्लिनिंगचे तांत्रिक कामे करण्याचा ठेका आहे. मात्र सेफ्टीच्या बाबतीत कंत्राटदार अडोरे यांनी कुठल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत, यावर देखरेखीची जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आज जवळपास 12.00 च्या दरम्यान यूनिट क्रमांक 6 मधे बॉयलर चे काम करीत असतांना कंत्राटदार अडोरे यांचे कामगार कर्मचारी चढता-चढता पडल्याने भाजून जखमी झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यापैकी एका कामगाराला डॉ. मेहता यांच्या रूग्णालयात तर उर्वरित तीन कामगारांना गाडेगोणे यांच्या रूग्णालयात भरती करण्यात आले असून एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहीती आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मागील अनेक वर्षापासून ठेकेदारी करणाऱ्या अडोरे या कंत्राटदारांला क्लिनिंगचे तांत्रिक कामे करण्याचा ठेका आहे. मात्र सेफ्टीच्या बाबतीत कंत्राटदार अडोरे यांनी कुठल्याच उपाययोजना केल्या नसल्याने आता या अपघाताने सिद्ध झाले आहे. सोबतच या विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे सुद्धा या सेफ्टीकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे. आता या अपघाताचे खापर कुणावर फोडल्या जाईल याबाबत स्पष्ट नसले तरी कंत्राटदार अडोरे आणि कार्यकारी अभियंता चव्हाण हे खरे कामगारांच्या अपघाताला दोषी असल्याची चर्चा आहे.
चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन मागील अनेक वर्षापासून कंत्राट देताना काही ठराविक कंत्राटदाराकडे विशेष लक्ष दिले जाते. यामधील एकाकडे हा कंत्राट असल्यामुळे आपसी लेन-देन या माध्यमातून अटी व शर्ती ना डावलून याठिकाणी कामगारांच्या जीवांवर खेळण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे. यात मात्र निर्दोष कामगारांच्या बळी जात असतो याकडे थर्मल पॉवर स्टेशन प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष होत असते.
0 टिप्पण्या