- गडचांदूर चा स्वयंभू युवा नेता प्रतिक (सदन?) पवार फरार!
- गडचांदूर चे छुटभय्ये नेते "प्रतिक" ला वाचविण्यासाठी सक्रीय!
- सपोनि विश्र्वास पुल्लरवार यांच्या नेतृत्वात झाली धडक कारवाई!
- गडचांदूर पोलिस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात!
(जिवती विशेष) : जिवती तालुक्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील केरामेरी येथून छुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती जिवती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे जिवती चे सपोनी विश्र्वास पुल्लरवार यांच्या नेतृत्वाखाली जिवती पोलिसांनी शुक्रवार दि. 15 मे रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान येसापुर-अंतापुर मार्गावर सापळा रचुन महागड्या अर्टिका वाहन (एम एच-24 व्हि 6550) सह 7 लाख 44 हजार 500 रुपयांची दारू जप्त करून चालकास अटक केली तर अंधाराचा फायदा घेत गडचांदुर चे रहिवासी असलेले सलमान पठान व प्रतिक पवार हे दोन आरोपी फरार झाले. महत्वाचे म्हणजे स्वयंभू नेता समजणारा प्रतीक पवार आता पोलिसांपासून आपले तोंड लपवित फिरत आहे व एका विशीष्ट पक्षाचे गडचांदूरचे छुटभैय्ये नेते त्याला वाचविण्यासाठी जिवाचा रान करीत असल्याचे कळते. या पक्षातून त्या पक्षात "कोलांडउडी" घेणाऱ्या एका मोठ्या (?) नेत्याच्या हा आरोपी जवळच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर नेत्याने मध्यस्थी करण्यासाठी केलेली धावपळीत तो उताणा पडल्याची गडचांदूर मध्ये खमंग चर्चा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला फार मोठे नेते-समाजसेवक दाखविणारे कितीतरी बघायला मिळतात, त्यातीलच हा वाहवत गेलेला तरूण आहे. स्थानिक नेत्यांच्या मागे-मागे फिरायचे, सोशल मीडियावर मोठ-मोठे फोटो टाकायचे यात आघाडीवर असलेला हा उमदा तरुण स्वतःला पोलिसांपासून वाचवित "प्रतिक" होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नातेवाईक व संबंधित असलेले पोलीस विभागाचे काही अप्रामाणिक व्यक्तींची प्रतीक ला साथ असून तो आता त्यांच्याच आश्रयात असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. आरोपींना सोडणार नाही अशी ठाम भूमिका जिवतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांनी बोलून दाखविली असल्यामुळे किती ही लपले तरी आरोपींना पोलिसी खाक्या दिसणारचं असे स्पष्ट चित्र आहे. राजुरा व गडचांदूर येथील मोठ्या दारू तस्करांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
अंधाराचा फायदा घेत गडचांदुर चे रहिवासी असलेले सलमान पठान व प्रतिक पवार हे दोन आरोपी फरार झाले. महत्वाचे म्हणजे स्वयंभू नेता समजणारा प्रतीक पवार आता पोलिसांपासून आपले तोंड लपवित फिरत आहे व एका विशीष्ट पक्षाचे गडचांदूरचे छुटभैय्ये नेते त्याला वाचविण्यासाठी जिवाचा रान करीत असल्याचे कळते. या पक्षातून त्या पक्षात "कोलांडउडी" घेणाऱ्या एका मोठ्या (?) नेत्याच्या हा आरोपी जवळच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर नेत्याने मध्यस्थी करण्यासाठी केलेल्या धावपळीत तो उताणा पडल्याची गडचांदूर मध्ये खमंग चर्चा आहे.
विशेष म्हणजे, तेलंगणा सीमेच्या अगदी लगत असलेल्या जिवती तालुक्यातून तेलंगाना प्रांतातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यापूर्वीही दारूचा पुरवठा होत होता. ही तेलंगाना ची दारू छुप्या मार्गाने जिवती, गडचांदूर मार्गे राजुरापर्यंत पोहोचत-पोहोचविल्या जात होती. दारूचे अनेक माफिया गडचंदुर राजुरा याठिकाणी कार्यरत आहेत. व्हाईट कलर म्हणवून घेणारे हे स्वयंभू नेते या कारवाईने धास्तावले असल्याचे सांगण्यास सांगितले जात आहे.
संचारबंदी नंतर यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. तेलंगणा राज्यातील जैनर व वाकडी याठिकाणी कोरोनाचे मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह रूग्ण मिळाले आहेत. तरीसुद्धा थोड्याश्या पैशाच्या लालसेने हा व्यवसाय पूर्ववत सुरू झाला असून गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाल भारती पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. गडचांदूर येथील आरोपी, स्वयंभू नेते, जिवती मार्गे गडचांदूर-राजूरा येथे मोठा साठा जमा करीत असतात, असे वृत्त साप्ताहिक विदर्भ आठवडी ने यापूर्वी प्रकाशित केले होते. परंतु त्याकडे गडचांदूर पोलिसांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून दुर्लक्ष केल्यामुळे जिवती चे पोलीस जे करू शकतात, ते गडचांदूर चे कां नाही अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिवती-तालुक्या लगत असलेल्या तेलंगणा राज्यातील केरामेरी येथून चुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती जिवती पोलिसांना मिळताच शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान येसापुर-अंतापुर मार्गावर सापळा रचुन वाहनासह सात लाख 44 हजार पाचशे रुपयांची दारू जप्त करून एकास अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. सहा. पोलिस निरिक्षक विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि.रमाकांत अमुगे, शैलेश दुर्गावाड,एकनाथ सुरनर यांनी येसापुर-अंतापुर या मार्गावर सापळा रचून 10 वाजताच्या दरम्यान एम एच-24 व्हि 6550 या अर्टिगा वाहनाची तपासणी केली असता कडाल्स या कंपनीच्या 110 नग व वाहन असा एकुण सात लाख 44 हजार पाचशे रुपयांची अवैध दारू जप्त करून आशिष सोनवणे यास अटक केली असून सलमान पठान व प्रतिक पवार हे दोघे आरोपी फरार असून तिघांविरुद्ध पोलिसांनी म.दा.का कलम 65
(अ) 83 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या