पंतप्रधान आणि केंद्रीय वित्‍तमंत्र्यांचे आ. मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन!



आत्‍मनिर्भर भारत पॅकेज च्‍या माध्‍यमातुन देशाची अर्थव्‍यवस्‍था बळकट होणार–आ. मुनगंटीवार
कोरोना विषाणूच्‍या जागतीक महामारीच्‍या संकटानंतर देशावर आलेल्‍या आपत्‍तीचे इष्‍टापत्‍तीमध्‍ये रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने देशाच्‍या एकूण जीडीपीच्‍या 10 टक्‍के रक्‍कम आत्‍मनिर्भर भारत या संकल्‍पनेच्‍या माध्‍यमातुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाची अर्थव्‍यवस्‍था अधिक बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने जे पाऊल उचलले आहे ते मोदीजींच्‍या मॅन ऑफ डेव्‍हलपींग इंडिया या विशेषणाला सार्थकी ठरविणारे आहे, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि वित्‍तमंत्री निर्मला सितारमण यांचे त्‍यांनी अभिनंदन केले आहे.


आत्‍मनिर्भर भारत या संकल्‍पनेच्‍या माध्‍यमातुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाची अर्थव्‍यवस्‍था अधिक बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने जे पाऊल उचलले आहे ते मोदीजींच्‍या मॅन ऑफ डेव्‍हलपींग इंडिया या विशेषणाला सार्थकी ठरविणारे आहे.-माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार

आत्मनिर्भर भारत या आर्थिक पॅकेजचे स्‍वागत करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पूढे म्‍हटले आहे की, 20 लक्ष कोटीच्‍या या पॅकेजमुळे निश्‍चीतच कोरोनाच्‍या या आपत्‍तीचे इष्‍टापत्‍तीमध्‍ये रूपांतर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी उठ तरूणा जागा हो विकासाचा धागा हो हा मंत्र देत सुक्ष्‍म उद्योग, लघु उद्योग, ग्रामोद्योग यांच्‍यासाठी कोणताही जामीन न देता कर्ज देण्‍याचा घेतलेला निर्णय अतिशय महत्‍वाचा आहे. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला या पॅकेजमुळे गती मिळणार असून बेरोजगाराच्‍या हाताला सुध्‍दा या माध्‍यमातुन काम मिळणार आहे. प्रामुख्‍याने कॉलेटरल फ्री लोनच्‍या माध्‍यमातुन 25 लाख एमएसएमईला फायदा होणार आहे. 200 कोटी पेक्षा कमी किमतीच्‍या कामांसाठी ग्‍लोबल टेंडर न करण्‍याचा निर्णय स्‍वदेशीला चालना देणारा आहे. देशात कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाला रोखण्‍यासाठी लॉकडाऊन लागू असल्‍यामुळे अर्थव्‍यवस्‍थेला खिळ बसण्‍याची परिस्‍थीती निर्माण झाली असताना, उद्योग व्‍यवसाय ठप्‍प झाले असताना तसेच सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या जीवनावर त्‍याचा विपरीत परिणाम होत असताना अशा पध्‍दतीच्‍या आर्थीक पॅकेजची नितांत आवश्‍यकता होती. ही गरज ओखळत नरेंद्रभाई मोदी यांनी देशवासियांना या पॅकेजच्‍या माध्‍यमातुन जो दिलासा दिला आहे तो निश्‍चीतच अभिनंदनीय व स्‍वागतार्ह आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या