आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मदतकार्य
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात नसला तरी, त्याचा स्फोट होऊ नये म्हणून घरीच रहायचे आहे. परंतु डॉक्टर आणि पोलिसांना हे शक्य नाही. या संकटाशी डॉक्टर्स आणि पोलीस जीवावर उदार होऊन लढत आहेत, असे प्रतिपादन भाजपा नेते रामपाल सिंह यांनी केले. ते दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे जिल्हा भाजपातर्फे आज १८ मे (सोमवार) ला आयोजित आरोग्य तपासणी व आरोग्य सुरक्षा किट वितरण उपक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी पोलिसांना आ. सुधीर मुनगंटीवार यांचे तर्फे आरोग्य सुरक्षा किट प्रदान करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, जि.प.सदस्य रोशनी खान, पं.स. सभापती केमा रायपुरे, सरपंच श्रीनिवास जंगमवार, संजय यादव, भाजपा नेते डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, फारूक शेख, विलास टेंभुर्णे, भारत रायपुरे, घनश्याम यादव, महेंद्र रहागंडाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामपाल सिंह म्हणाले, कोरोनाशी थेट लढा पोलीस देत आहेत. पण त्यांना सुरक्षा कवच नाही. हा विषय लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सुरक्षा किट पोलीस बांधवांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करून सुरक्षित रहा, सेवेत रहा, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.
याप्रसंगी आरोग्य सेविका मायावती खोब्रागडे, प्रियंका उराडे, प्रवीण चंदनखेडे यांनी डॉ अमित जयस्वाल यांचे मार्गदर्शनात सर्व पोलिसांची आरोग्य तपासणी करून गरजवंतांना निःशुल्क औषध दिले. विशेषतः जि.प. सदस्या रोशनी खान यांचे हस्ते पोलिस निरीक्षक डी. एस. खोब्रागडे यांना तर सभापती केमा रायपुरे यांचे हस्ते महिला पोलीस कर्मचा-यांना आरोग्य सुरक्षा किट देण्यात आली.
प्रास्ताविक डॉ मंगेश गुलवाडे यांनी तर संचालन श्रीनिवास जंगमवार यांनी केले. प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत रायपुरे, नामदेव आसुटकर, मनोज मानकर, श्रीकांत देशमुख, बाला खान, देवानंद थोरात, उज्वल धामनगे, आकापेलिवार यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या