खळबळजनक...! चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह!




चंद्रपूर : आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार शहरातील बिनबा परिसरात एक कोरोना रूग्ण आढळला असून, चंद्रपूर जिल्हाशल्य चिकीत्सक निवृत्ती राठोड साहेब यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की या बिनबा परिसरात राहणारे हे कुटुंब यवतमाळ येथे मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होते, रुग्णाची आईच्या एका खाजगी रुग्णालयात यवतमाळमध्ये उपचार सुरू होते. तिच्या देखभालीसाठी हे पूर्ण कूटूंब यवतमाळ येथे गेले होते. 9 तारखेला हे कुटुंब चंद्रपूर येथे परत आल्यानंतर त्यांना होम कोरोनटाईन करण्यात आले, आज बुधवार दि. 13 मे रोजी दोघांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव आला असून दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यापुर्वी चंद्रपूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर खळबळ माजली होती. आज मिळालेल्या पॉझिटिव रूग्णाने ही संख्या दोन झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या