उद्या शूक्रवार दि. २२ पासून एस.टी.बस सेवा सुरू !



  • फक्त २२ प्रवाशांना प्रवास करता येणार
  • प्रवासा दरम्यान मास्क वापरणे अनिवार्य
  • बसमध्ये प्रवेश करतांना सॅनिटायझर अथवा साबणाने हाथ स्वच्छ करूनच प्रवेश

चंद्रपूर : उद्या शुक्रवार दि. २२ मे २०२० पासून जिल्हाअंतर्गत एस.टी.बस सेवा सुरू होत असून लॉकडाउन ४ अंतर्गत शासनाचे पत्र क. डीएमयु/२०२०सी.आर.-९२/डीआयएसएम.१ दि. १९ मे २०२० नुसार राज्यातील बिगर रेड झोन जिल्हयांध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक प्रवासी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांसह सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयाअंतर्गत प्रवासी वाहतूक सामाजिक अंतर राखून व निर्जतूकीकरण उपाय राखून दिनांक २२ मे २०२० पासून सुरू करण्यात येत आहे. सदर सेवा ही सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेतच सुरू राहील.
प्रवाशांनी प्रवासा दरम्यान शासनाने निर्गमीत केलेल्या खालील अधिसुचनांचे पालन करावे.

रा.पं.बस ची आसन क्षमता ही एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के निर्धारीत करण्यात आलेली आहे. म्हणजेच बसमध्ये फक्त
२२ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. २.बस मध्ये चढ उतार करीत असतांना सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. ३.प्रत्येक आसनावर स्वतंत्र १ प्रवासी बसण्याची मुभा राहील. ४.प्रवासा दरम्यान मारकै वापरणे अनिवार्य राहील. तसेच बसमध्ये प्रवेश करतांना सॅनिटायझर अथवा साबणाने हाथ स्वच्छ
करूनच प्रवेश करावयाचा आहे. ५.६५ वर्षावरील प्रवाश्यांना (वैद्यकिय उद्देश वगळता) रा.प. बस द्वारे प्रवास करणे अनुज्ञेय नाही. ६.१० वर्षाखालील मुलांना (वैद्यकिय उद्देश वगळता) रा.प. बस द्वारे प्रवास करणे अनुज्ञेय नाही.
७. गर्भवती महिलांना रा.प. बस द्वारे प्रवास करणे अनुज्ञेय नाही. - ८.आजारी व्यक्तींना रा.प. बस द्वारे प्रवास करणे अनुज्ञेय नाही अशी माहिती राज्य परिवहन, चंद्रपूरचे
विभाग नियंत्रक यांनी कळविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या