- 75 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
- संस्थात्मक अलगीकरणात 905 नागरिक
चंद्रपूर जिल्हातील 43 बाधित, कोरोना आजारातून झाले बरे
आतापर्यतची बाधित संख्या 62; जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 19
शहरातून 16 जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( 40 वर्षीय ), वडील ( 47 वर्षीय ) व मुलगा ( 21 वर्षीय ) बाधित असल्याचा अहवाल काल आला होता. आज मुलीचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुलीचे स्वॅब नमुने 23 जून रोजी घेण्यात आले होते. 24 जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
सेल्फ असेसमेंट, ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी, फोरकास्ट इमर्जिंग हॉटस्पॉट विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. सेल्फ असेसमेंटद्वारे 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 28 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 28 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ प्रॉक्सीमिटीद्वारे 94 नागरिकांशी संपर्क केलेला असून 87 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 87 नागरिकांपैकी 8 पॉझिटिव्ह, 72 निगेटिव्ह तर प्रतीक्षेत 7 नमुने आहेत.
दिनांक 13 जून पासून दिनांक 24 जून पर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू फॉरकास्ट, इमर्जिंग हॉटस्पॉट अंतर्गत 22 गावांमध्ये 48 पर्यवेक्षक, 400 पथके 21 हजार 800 घरे व 94 हजार 586 लोकसंख्येच्या माध्यमातून 14 हजार 4 कोमॉरबीडीटी असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 104 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 47 स्वॅब घेण्यात आले आहे व उर्वरित नागरिकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण 28 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 21 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत.तर, 7 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीन, वरोरा दोन, राजुरा दोन, मुल, भद्रावती, ब्रह्मपुरी,कोरपणा,नागभिड प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ दोन, बालाजी वार्ड , भिवापूर वार्ड , शास्त्रीनगर प्रत्येकी एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, बिनबा वार्ड एक, लुंबिनी नगर 4 बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 62 वर गेली आहे.
कोविड-19 संक्रमित 62 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-5, सिकंदराबाद-1, मुंबई-10, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
जिल्ह्यात 3 हजार 415 स्वॅब नमुने तपासणीस पाठविलेले होते. यापैकी 62 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 22 नमुने निगेटिव्ह, 306 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर 25 नमुने अनिर्नयित आहेत.
जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणा विषयक माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 905 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 332, तालुकास्तरावर 252, तर जिल्हास्तरावर 321 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79 हजार 844 नागरिक दाखल झालेले आहेत. 75 हजार 200 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच 4 हजार 644 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार )आणि 24 जून (एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 62 झाले आहेत. आतापर्यत 43 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 62 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 19 आहे.
0 टिप्पण्या