- जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 39 !
- आतापर्यंत 22 बाधित कोरोना मुक्त !
- नागरिकांनी मास्क लावणे अनिवार्य !
- समस्या व माहितीसाठी अधिकृत संपर्काचा करावा वापर !
चंद्रपूर, दि. 8 जून: जिल्ह्यातील अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 17 आहे. यापैकी, 14 कोरोना बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहेत. तर तीन कोरोना बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 22 कोरोना बाधितांना कोरोना मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच शारीरिक अंतर राखून दैनंदिन कामे करावी व आरोग्याची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यामध्ये 1 हजार 622 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 39 नमुने पॉझिटिव्ह,1 हजार 369 नमुने निगेटिव्ह तर 214 नमुने प्रतीक्षेत आहेत.
कोविड-19 संक्रमित 39 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1, हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत - 9 आहे.
जिल्ह्यात एकूण 23 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 11 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 6 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. तर 6 कंटेनमेंट झोन सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजपर्यंत एकूण 17 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 44 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 42 नमुने निगेटिव्ह व दोन नमुने प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 268 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 630 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तालुकास्तरावर 352 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्हास्तरावर 286 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 75 हजार 736 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 70 हजार 474 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 5 हजार 262 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण 2 बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 39 झाले आहेत. आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 17 आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी 07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या