- आतापर्यंत 13 रुग्ण कोरोना मुक्त !
- दोन्ही मृत व्यक्तीचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह!
- अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10, प्रकृती स्थिर !
- 73 हजारावर नागरिक जिल्ह्यात दाखल !
- जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित !
जिल्ह्यात एक आणखी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण संख्या 23
चंद्रपूर, दि. 1 जून: मुंबई येथुन आलेला युवकाचा स्वॅब नमुना 31 मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 जूनला 23 झाली आहे. यापैकी,जिल्ह्यात दिनांक 23 मे रोजी आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह बाबुपेठ परिसरातील युवती कोरोना मुक्त झाली असून तिला आज सुटी देण्यात आली आहे. सध्या 13 रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण 10 आहेत.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 10 आहे.या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
दरम्यान, दिनांक 30 मे रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एकाचे आकस्मिक तर एका रुग्णाने अलगीकरण कक्षात आत्महत्या केली होती. मृत्यूपश्चात या दोघांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दोघांच्या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोन्ही अहवाल निगेटिव्ह आहेत ,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
कोविड-19 संक्रमित 23 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-4, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3,कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार, जिल्ह्यामध्ये 966 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 23 नमुने पॉझिटिव्ह, 883 नमुने निगेटिव्ह तर 60 नमुने प्रतीक्षेत आहेत.
दिनांक 1 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 82 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 3 हजार 416 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.तालुकास्तरावर 306 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्हास्तरावर 360 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 73 हजार 332 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 64 हजार 676 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 8 हजार 656नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन ) मध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआय, सारीचे 11 नमुने घेतले असून आयएलआय, सारीचे 10 नमुने निगेटिव्ह आले आहेत.तर, एक नमुना प्रतीक्षेत आहे.
चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण) व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ), 31 मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 13 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 10 आहे.
0 टिप्पण्या