शुक्रवार दि. 5 जूनला मिळाला
होता कोरोना बाधित रूग्ण!
(चंद्रपूर विशेष)
शुक्रवार दि. 5 जून ला भिवापूर वार्डामध्ये कोरोना बाधित रूग्ण मिळाला. रुग्ण मिळाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे भिवापूर वार्डातील काही भाग सील करण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील हनुमान मंदिर जवळ, भिवापूर वार्ड, प्रभाग क्र. १४ या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागांत पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हीत व सुरक्षेस्तव संदर्भीय आदेशाच्या अनुषंगाने अधिकच्या आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील भिवापूर वार्ड प्रभाग क्र १४ भागातील (उत्तर - पूर्व) श्री. पठाण याचे घरापासून ते श्री. निखारे यांचे घरापर्यंत, (उत्तर - पश्चिम) श्री. निखारे यांचे घरापासून ते भिमज्योती मंडळ बौध्द विहार पर्यंत, (दक्षिण - पश्चिम) भिमज्योती मंडळ बौध्द विहार पासून ते हरिओम किराणाचे दुकानापर्यंत, हरिओम किराणाचे दुकानापासून ते श्री. पठाण यांचे घरापर्यंत (द?क्षिण - पूर्व) हा भाग महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या आदेशानुसार सील करण्यात आला आहे.
घाबरून जाण्याचे कारण नाही, नागरिकांनी सतर्क राहावे, शासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करावे, बाहेर निघतांना माॅस्क वापरावा, सोशल डिस्टन्सिग चे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.
मोहल्ला समितीचे बॅनर !
आजपासून भिवापुर वार्डामध्ये covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहल्ला समितीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर वर 16 लोकांचे नाव, मोबाईल नंबर सहीत दर्शविण्यात आले आहेत. यातील 4 नगरसेवक, 6 शासकीय कर्मचारी व अन्य समाजसेवकांची नांवे आहेत. या सर्वांना covid-19 जनजागृतीसंदर्भात मोहल्ला कमेटीत समावेश करण्यात आला असून नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"कोणता भाग सिल?"
माहिती देण्यास एवढा विलंब कां?
संचारबंदी पासून पत्रकारांना माहिती ही मोबाईल वरच मिळाली आहे. भिवापूर प्रभागात रुग्ण मिळाल्यानंतर "कोणता एरिया सील करण्यात येणार-आला?", याविषयीची शासकीय अधिकृत माहिती मिळावी यासाठी 5 जून पासूनच संबंधित विभागातील विविध अधिकाऱ्यांना संपर्क करणे सुरू होते परंतु जवळपास धनंजय सरनाईक, डॉ. खेरा, पोलिस उपनिरीक्षक जगताप यांचेसह 25 जणांसोबत संपर्क करण्यात आला, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून कोणतेचं उत्तर देण्यात नाही. आज भिवापूर वार्डामध्ये मोहल्ला समितीचे बॅनर लागल्यानंतर प्रत्येकाशी पत्रकार या नात्याने माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्न केला त्यामध्ये सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक हे सुद्धा होते परंतु कोणता भाग सिल करण्यात आला, यासंबंधात माहिती मिळाली नाही. बहुतेकांनी फोन उचललाचं नाही. शेवटी 11.20 ला प्रभारी अधिकारी नरेंद्र बोबाटे यांनी फोन उचलून सदर माहिती आली असून ती आपल्याला देऊ शकत नाही असे स्पष्ट सांगून धनंजय सरनाईक यांच्याशी संपर्क करायला सांगितला. सरनाईक यांना कॉल केला असता त्यांनी फोन उचलला नाही. शेवटी दुपारी 12.16 ला सदर माहिती कुठून मिळेल असा SMS चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी महोदयांना पाठविला. त्वरित 12.30 ला जिल्हाधिकारी महोदयांनी यासंदर्भात उत्तर दिले. चंद्रपूर चे नवनियुक्त मनपा आयुक्त राजेशजी मोहिते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी धनंजय सरनाईक यांचेकडून माहिती कलेक्ट करावी असे उत्तर दिले आणि सरनाईक यांनी "कोणता भाग सील करण्यात आला." याची माहिती उपलब्ध करून दिली. माहिती गोपनीय नव्हती एवढा आटापिटा कशाला? वरिष्ठ अधिकारी सुट्टीचा विचार न करता प्रामाणिकपणे आपले कार्य बजावीत आहे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी फक्त आम्ही ही आपले कार्य बजावीत आहोत असे न दाखविता, कर्तव्याची जाण ठेवायला हवी, एवढेचं सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच!
"ते" पोलिसाचे वाहन?
MH-34-8563 या क्रमांकाचे पोलिसाचे वाहन अंदाजे 11.15 च्या सुमारास भिवापूर वार्डात एका ठिकाणी थांबले. वाहनातील चालकासह सारेजण उतरून कुठेतरी "धडधड" करीत गेले आणि रिकाम्या हाती वापस आले. चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाची कोरोना संबंधातील कामगिरी ही "सलाम" ठोकावी अशी आहे, परंतु काही कृत्यामुळे या विभागाची मलिन झालेली प्रतिमा आणखी काळीकुट्ट होत आहे. माहिती चुकीची की माणसे चुकीचे की नियतीत खोटं यांचे आत्मचिंतन मात्र यानिमित्ताने व्हायलाचं हवे. भिवापूर वार्डात आलेले हे पोलिसाचे वाहन आले कुठे व कशासाठी याची ही आज या परिसरात मोठी चर्चा होत आहे, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अवश्य चौकशी करावी.
0 टिप्पण्या