एसीसी सिमेंट कंपनीच्या सळाख व इतर साहित्य चोरी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करा !



  • मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या तक्रारी !
  • पत्रकार परिषदेत छायाचित्रासह केले पुरावे सादर!
  • कंत्राटदार राजु रेड्डीकडून जुन्या चोरी प्रकरणाची पुनरावृत्ती केल्याचा आरोप !

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस स्थित एसीसी सिमेंट कंपनी नकोडा येथुन मागीलवर्षी 'नॉट फार सेल सिमेंट' चोरी झालेल्या प्रकरणाची चौकशी होऊन राजु रेड्डी नामक एसीसी सिमेंट कंपनीच्या कंत्राटदारांवर घुग्घुस पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होवून एसीसी सिमेंट कंपनीच्या एका गेट मधुन कंपनीच्या गोडावून मधील लोहा, सलाखी, रॉड व लोखंडी अँगल एका ट्रकमध्ये भरून दिनांक ९ मे २०२० ला व इतर तारखेला नेलेल्या साहित्याचा वापर राजु रेड्डी यांच्या घराशेजारी बांधण्यात येणाऱ्या एका सार्वजनीक हॉलच्या बांधकामात वापरल्या जात आहे. ही माहिती मिळताच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिनांक १९ मे २०२० रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.


विशेष म्हणजे लोढा गोल्ड कंपनीच्या सलाखी २० एमएम, १० एमएम व ८ एमएम ह्या केवळ एसीसी सिमेंट कंपनीच्या बांधकामात वापरल्या जाते, त्या इतरत्र वापरल्या जात नाही, त्यामुळे लॉकडाऊनचा दुरूपयोग करून एसीसी कंपणीचे काही अधिकारी व सुरक्षा अधिकारी आणि चोरट्यांनी म्हणजे कंत्राटदारांच्या मदतीने हा माल लंपास केला असल्याची शक्यता आहे. कंत्राटदार राजु रेड्डी यांचे एसीसी सिमेंट कंपनीच्या गोडाऊन लगत खाजगी गोडाऊन आहे. त्या गोडाऊनचे साहित्य सलाखी व ईतर सामान कंपनीतून चोरल्या जावून ते साहित्य राजु रेड्डी यांच्या घराशेजारी बांधण्यात येणाऱ्या हॉल च्या बांधकामात वापरल्या गेले आहे. महत्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनमध्ये सर्व बांधकाम बंद ठेवण्याचे शासनाचे व स्थानिक स्तरांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना राजु रेड्डीच्या घराजवळ बांधकाम कसे काय व कुणाच्या परवानगीने सुरू होते ? हा प्रश्न महत्वाचा असून त्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे बिल जर तपासले तर हा माल निश्चितच एसीसी सिमेंट कंपनीचा असू शकतो, त्यामुळे या प्रकरणात नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणासारखा एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यामधे हात असू शकतो. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा राखली जावी व सार्वजनिक संपतीची चोरी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या उदात हेतुने आपण जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली असल्याचे मत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या