शहरातील कृष्णनगर येथे आढळला आणखी एक पॉझिटीव्ह!


  • जिल्हात ४८ बाधीत !

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगर केरला कॉलनी परिसरात आज सोमवारी २५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या पंचवीस वर्षीय बाधिताला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथून चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या युवकाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. काल लक्षणे दिसायला लागल्यावर त्यांचा स्वॅब घेण्यात आला.आज अहवाल पॉझिटीव्ह आला.

काल चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला होता. आज सोमवारी एक काल रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ झाली आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) १३ जून ( एक बाधीत ) १४ जून ( एकूण ३ बाधीत ) आणि १५ जून ( एक बाधीत अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४८ झाले आहेत.आतापर्यत २५ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४८ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २३ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या