गडचांदूर : आज सोमवार दि. 15 जून रोजी पडलेल्या मुसळधार विज कडाडून पडलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक सात गडचांदूर च्या रहिवासी सुनंदा सुधाकर बावणे यांचा विज पडून दुर्देवी मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यातील भुरकुंडा भेंडवी येथे संतोष आलाम यांच्या शेतात सुनंदा सुधाकर बावणे (३६) या शेतकामासाठी गेलेल्या होत्या. एकाएकी विज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतकाला एक मुलगा व एक मुलगी आहे. मृतक सुनंदा बावणे या विधवा होत्या व त्यांचा कुटूंबाचा भार हा त्यांच्यावरचं होता. कोरोनाच्या संचारबंदी मुळे आधीच संपुर्ण देश अडचणीत आला आहे. त्यातच येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला येत आहे. सुनंदा बावणे यांच्या मृत्युमूळे त्यांच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे.
0 टिप्पण्या