नागरिकांनो सतर्क रहा, विजेशी संबंधित खालील सुचना अवश्य वाचा!



महावितरणच्या सर्व ग्राहकांना आवाहन !

महाराष्ट्रामध्ये आलेल्या भयानक चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. हे चक्रीवाद आणखी दोन दिवस थैमान घालणार असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सतर्क राहावे असे आव्हान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहेत. यासंदर्भात वीजग्राहकांना Msedcl ने नुकत्याच काही महत्त्वाच्या सुचना-आव्हान केलेले आहे. त्यानुसार विजेशी संबंधित कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक वीज ग्राहकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यानुसारच प्रत्येकाने खालील सुचणांचे आवर्जून पालन करावे यासाठी महावितरण ने केलेल्या या आव्हानाला प्रत्येकांनी गांभीर्याने घेऊन सूचनांचे पालन करावे व या सूचना आपल्या प्रत्येक परीचिंताकडे अवश्य पाठवाव्या.

खालील सुचना गांभिर्याने वाचावी व ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. महावितरणच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८०० २३३ ३४३५ / १८०० १०२ ३४३५ / १९१२ वर त्वरित कळवा.

  • (टिप : यासोबतचं आपापल्या भागातील mseb शी संबंधित क्रमांक ही जवळ बाळगा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या