रामनगर पोलिसांची रेती तस्करांवर मोठी कारवाई !



  1. हायवा व जेसीबी चालकाला अटक!
  2. राजकीय पैठ असलेला रेती तस्करांवर ही होणार कारवाई !
  3. रेती तस्करांवर पोलिसांची पहिलीच कारवाई !

चंद्रपूर : जिल्ह्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे व शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलाची खुलेआम चोरी होत असल्याच्या अनेक घटना लॉकडाऊन दरम्यान ऐकण्यात आल्या. नुकतेच राज्याचे गृहमंत्री नाम. अनिलजी देशमुख यांनी रेती तस्करीवर आळा बसविण्यासाठी पोलिस, महसुल व तहसिल विभागाने संयुक्तिकरित्या कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतर रामनगर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार दि. २०/०६/२०२० रोजी रामनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा जयपुरजवळ अंधारी नदी शेजारील शेतात एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने रेती उचलुन हायवा ट्रक द्वारा चोरून नेत आहे. अशा माहितीवरून रामनगर पोलीसांनी तलाठी, कर्मचारी यांचेसह अंधारी नदीजवळ जावुन पाहणी केली असता, एक इसम जेसीबी मशीनच्या साहायाने हायवा ट्रक मध्ये रेती लोड करीत होता. यावरून जेसीबी चालक आरोपी नामे तुळशिराम भाउजी देवरे आणि हायवा ट्रक चालक आरोपी नामे आदिल खान अहमद खान रा. बाबुपेठ यांना अटक करण्यात आली.पण जेसीबीचे मालक आणि हायवा ट्रकचे मालक जे राजकीय पदाधिकारी आहे, त्या मालकांना सुद्धा अटक होणार असल्याची माहिती आहे.
प्रथमदर्शनी सदरच्या घटनेचा गुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क ५४३/२०२० कलम ३७९,१८८,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून
या गुन्हयात एक जेसीबी मशीन क. एमएच ३४ एपी ३४३३ की. १५,००,०००/-रू, एक हायवा ट्रक क. एमएच३४ एम ३६६४ किं.१०,००,०००/-रू, 32 ब्रॉस रेती किं. ७७,५००/-रू असा एकुण २५,७७,५००/-रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनात पोनि. रामनगर प्रकाश हाके यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली असून पोलीस निरीक्षक प्रकाश हाके हे या प्रकरणात अधीकचा तपास करीत आहे. आता जेसीबी व हायवा मालक यांच्यावर कुठली कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या