मंगळवारी दुपारपर्यंत ६ बाधितांची नोंद, एकंदर 204!



चंद्रपूर कोरोना अपडेट
  • जिल्ह्यातील बरे झालेल्या बाधिताची संख्या १०४ !
  • १०० बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू!

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधिताची संख्या २०४ झाली आहे. १०० बाधित सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर १०४ बाधित सध्या कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत.त्यापैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे १० जवान व ५ जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.

आज १४ जुलै २०२० दुपारी ४.३० वाजता आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील २३ वर्षीय नागरिक पॉसिटीव्ह आला आहे. हैद्राबाद येथून ९ जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. भद्रावती येथील बंगळूरू शहरातून १० जुलैला परत आलेल्या २२ वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ११ जुलैला स्वॅब घेण्यात आला होता. चंद्रपूर अंचलेश्वर गेट जवळील केरळ राज्यातून परत आलेला २८ वर्षीय युवक पॉझिटीव्ह ठरला आहे. ९ जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. १२ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज पॉझिटीव्ह अहवाल आला. या शिवाय पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले ३ जण पुढे आले आहेत. यामध्ये सिव्हिल लाइन चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली ४७ वर्षीय पत्नी, १८ व १० वर्षीय दोन मुले यांचा सहभाग आहे. या सर्वांचा स्वॅब १२ जुलैला घेण्यात आला होता.

         दरम्यान , जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार  चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) ५ जुलै ( एकूण ३ ) ६ जुलै ( एकूण ७ )  ८ जुलै ( एकूण ५ )  ९ जुलै ( एकूण १४ ) १० जुलै ( एकूण १२ ) ११ जुलै ( एकूण ७ ) १२ जुलैला ( एकूण १८) १३ जुलैला ( एकूण ११ ) व १४ जुलै ( एकूण ६ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित २०४ झाले आहेत. आतापर्यत १०४ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २०४  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता १०० झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या