अखेर गडचांदुर मध्ये 28 पासून तर 2 तारखेपर्यंत LOCKDOWN !



  1. 28 ते 31 कडक तर नंतर शिथिलता !
  2. रविवार दि. 26 चा दिवस गडचांदूरकरांना "संभ्रमात" टाकणार !
  3. नगरसेवकांना कल्पना नसलेली गडचांदूरातील SDO लोंढे यांची कोरोना आढावा बैठक व गडचांदूर चा lockdown!
  4. महत्त्वाचे व तेवढेच गंभीर ही !
  5. मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह !

गडचांदूर : राजुरा तहसिल चे उपविभागीय दंडाधिकारी जे. पी. लोंढे यांनी काढलेल्या आदेशानुसार गडचांदूर शहरामध्ये 28 पासून 2 तारखेपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. 28 चे 1वाजेपासून ते 2 अॉगस्टचे 24 वाजेपर्यंत हा lockdown राहणार असल्याचा आदेश आहे. यामध्ये 28 ते 30 या तीन दिवसात शहरातील फक्त मेडिकल, शासकीय कार्यालय व दूध पुरवठा सुरू राहील म्हणजे कडक lockdown पाळण्यात येणार तर 31 ते 2 तारखेपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत काही विशेष दुकानांना सुविधा देण्यात आली आहे. या आदेशानुसार उद्या 28 पासून 2 तारखेपर्यंत 6 दिवस lockdown जाहिर आदेश काढण्यात आला जनतेने याची काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रविवार दि. 26 चा दिवस गडचांदूरकरांना "संभ्रमात" टाकणार !


रविवार दि. 26 जुलै हा दिवस गडचांदूरकरांना संभ्रमात टाकणारा राहिला. काही दिवसापूर्वी गडचांदूर च्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी गडचांदुर शहरात दोन दिवसाच्या जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नगरवासीयांना केले होते. त्यासंदर्भात रविवार दि. 26 रोजी गडचांदुर नगर परिषद हॉल मध्ये गडचांदुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल चिंतलवार व गडचंदुर व्यापाऱ्यांनी या सभेचे आयोजन केले या सभेला गडचांदुर च्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नगरसेवक सागर ठाकुरवार यांचेसह गडचांदूरमधील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मंडळींनी उपस्थिती दर्शविली होती. प्रत्यक्षदर्शीच्या मते सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सभेत सोमवार 27 व मंगळवार 28 रोजी गडचांदूरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले, तसे संदेश WhatsApp च्या माध्यमातून गडचांदूर परिसरात समाजसेविकांनी प्रसारित ही केले. व्यापाऱ्यांच्या या सभेनंतर उपस्थित नगरसेवकांनीव पदाधिकाऱ्यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत न.प. सभागृहात या विषयावर चर्चाही केल्या. त्यानंतर लगेच काही अवधीनंतर गडचांदूर शहरात 28 पासून लाॅडाऊन लागणार असल्याचे शासकीय वृत्त प्रकाशित होऊ लागले गडचांदुरकर मात्र यामुळे संभ्रमित झाले.

नगरसेवकांना कल्पना नसलेली गडचांदूरातील SDO लोंढे यांची कोरोना आढावा बैठक व गडचांदूर चा lockdown!


गडचांदूर नगरपरिषद मध्ये त्याच दिवशी म्हणजे रविवार दि. 28 जुलै रोजी राजुरा चे SDO लोंढे, न. प. चे उपाध्यक्ष शरद जोगी, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नळे व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत कोरोना आढावा सभा घेऊन त्याठिकाणी 28 ते 2 पर्यंत lockdown लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. गडचांदूर न.प. सभागृहात घेण्यात आलेल्या या सभेत कोणतीही पूर्वसूचना नगरसेवकांना देण्यात आली नाही. शहराबात घेण्यात येणारे निर्णय नगरसेवकांना डावलून किंवा विश्वासात घेऊन कसे काय घेण्यात येत आहे याविषयी गडचांदूरच्या नगरसेवकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्यादिवशी न.प. हॉल मध्ये झालेल्या सभेत गडचांदूर चे सत्ताधारी काँग्रेस, राकॉं सोबत सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असलेली शिवसेना+शेतकरी संघटना (5+1=6) उपस्थित होती, परंतु त्याच गडचांदूर च्या न.प. सभागृहात महत्त्वाच्या विषयावर सहभाग घेण्यात येते व त्याची माहिती इन गडचांदूर च्या नगरसेवकांना मिळत नाही ही बाब गंभीर आहे.

महत्त्वाचे व तेवढेच गंभीर ही !

23 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी राजुरा व गडचांदूर येथे कोरोनाची वाढती संख्या बघता भेट दिली व आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात नगर परिषद सभागृहात आढावा घेण्यात आलेल्या बैठकीत गडचांदूर शहरात लॉकडाऊन संदर्भात झालेल्या चर्चेत शहरातील आढळून आलेल्या बाधितांचा प्रवासाचा इतिहास असल्याने व त्यांचा इतरांसोबत कॉन्टॅक्ट नसल्याने लॉकडाऊनची गरज नसल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. मग आज एकाएकी lockdown चा घेण्यात आलेला निर्णय याविषयी नगरसेवकांमध्ये विविध चर्चांना पेव फुटले आहे.

मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह !
गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची भूमिका ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्ष असो की गडचांदूरकरांचा समस्या असो संचारबंदी दरम्यान त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले, त्याबाबत तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत. नुकत्याच 26 जुलै रोजी गडचंदुर मनपा सभागृहात राजूरा चे SDO लोंढे यांची कोरोना याविषयीची अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आढावा बैठक होती, या आढावा बैठकीची पुर्वसुचना गडचांदुर येथील नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना जाणिवपुर्वक मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांनी दिली नाही, ही माहिती सर्व लोकप्रतिनिधी पासून लपवून ठेवण्यात आली, या दिवशी न.प. सभागृहात एक विशेष सभा होती, या सभेमध्ये बहुतेक सगळेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते, त्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती. अगदी वेळेवर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पाचारण करण्यात आले हा पदाचा गैरवापर असल्याचा आरोप गडचांदूर त्यात काही नगरसेवकांनी केला आहे यासंदर्भात गडचांदूर नपच्या मुख्याधिकारी यांची निष्पक्ष चौकशी करण्यात येऊन त्यांचे व यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी नगरसेवकांकडून होत आहे. प्रशासनाने लॉकडाऊन संदर्भात दिलेले आदेश पाळण्यासाठी गडचांदूर चे नगरसेवक व पदाधिकारी कटिबद्ध आहेत. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वपक्षिय नगरसेवक एकवटले असून गडचांदुर शहराला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प असुन गडचांदुरच्या प्रत्येक नागरिकांनी lockdown नियमांच्या बंधनात राहून पाळावा, असा संदेश व प्रतिक्रीया यानिमित्ताने गडचांदूरच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या