- पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पाचे आज आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन !
- आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर अगरबत्ती प्रकल्प !
- राज्य शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून प्रामुख्याने निधी प्राप्त!
पोंभुर्णा : राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पाचे उदघाटन आज मंगळवार दि. 28 जुलै 2020 रोजी सायं. 4.00 वा. करण्यात येणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर अगरबत्ती प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतून प्रामुख्याने निधी प्राप्त झाला आहे. शेवटच्या टप्प्यातील काही कामासाठी जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानकडून सुद्धा निधी प्राप्त झाला आहे. सदर प्रकल्प यापूर्वी भाड्याच्या इमारतीत दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. त्यात २५ मशीन बसवून तात्पुरत्या स्वरुपात उत्पादन सुरु करण्यात आले होते. सदर अगरबत्ती प्रकल्पातून निर्माण होणारे अगरबत्तीचे उत्पादन खरेदी करण्याची जबाबदारी (Buyback) आयटीसी यांनी घेण्यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आयटीसीच्या प्रमुखांशी चर्चा केली, आयटीसीने सुध्दा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार आयटीसी या नामवंत कंपनीच्या ‘मंगलदीप’ अगरबत्ती ब्रान्डचे उत्पादन येथे घेण्यात येत आहे. आजपर्यंत रु. ९२.४२ लक्ष किंमतीच्या ५५ मे.टन अगरबत्तीचे उत्पादन करण्यात आले आहे.
आजतागायत या प्रकल्पाच्या प्रशस्त शेड वजा इमारतीत एकूण ७५ स्वयंचलित मशीनद्वारे कच्ची अगरबत्ती उत्पादित केली जाणार आहे. तसेच बसविण्यात आलेल्या आधुनिक संयंत्राद्वारे सेटिंग, पॅकेजिंग ही पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरमहा ७५ मेट्रिक टन अगरबत्तीचे उत्पादन घेता येणे शक्य होणार आहे. यातून सुमारे २०० स्त्री तसेच पुरुषांना प्रकल्पात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हा अगरबत्ती प्रकल्प साकारण्यासाठी मध्य चांदा वनविभागाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ चे कलम ३ पोटकलम २ अंतर्गत वनजमीन मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने योजना मंजुरी व निधी देण्यासंबंधात सहकार्य केले. त्यामुळे प्रकल्पाचे काम अल्पावधीत पूर्ण करता आले.
पोंभुर्णा येथील महिला तसेच पुरुष प्रकल्पात परिश्रमपूर्वक जिद्दीने काम करित आहेत. जी जिद्द कायम राखून धार्मिक शुभ कार्यात वापरल्या जाणा-या अगरबत्ती उत्पादनासाठी आपले भरीव योगदान देत आहे. तसेच पोंभुर्णाच्या लौकिकात भर पाडणारा भारतातील एक अगरबत्ती प्रकल्प आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आला आहे.
पोंभुर्णाच्या लौकिकात भर पाडणारा भारतातील एक अगरबत्ती प्रकल्प !
0 टिप्पण्या