भाजप कार्यकर्त्या कडून होत असलेल्या कुटुंब सर्वेक्षनात वैयक्तिक माहिती देऊ नये म्हणून नागरिकांत संभ्रम निर्माण करू नये!





  • सतीश बिटकर यांना अरविंद डोहे नगरसेवक यांचे आव्हान!
गडचांदूर - अख्ख्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे शासन प्रशासन सर्वोत्तपरी उपाययोजना करीत आहे.परन्तु भारतीय जनता पार्टीने दायित्व स्वीकारून सम्पूर्ण भाजपचे नेते कार्यकर्ते कार्य करीत आहे. गोरगरिबांना धान्य किट वाटप असो वा मास्क वाटप असो वा सैंनीटाईझर चे वाटप कोरोना काळात रक्तदान वाटसरूंना भोजन देणे असो यात कुठेही पक्ष कमी पडला नाही. शासनाकडून घर सर्वेक्षण करून ताप, सर्दी,खोकला याची माहिती तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करण्याचे व कवारन्टीन करण्याचे काम प्रशासनाने केले आहे.त्यांना मदत म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सदरची माहिती गोळा करणे इतर कुठून बाहेर गावावरून येणाऱ्याची माहिती प्रशासनाला देण्याचे उत्तम कार्य करीत आहे.अनेक लोकांना राशन कार्ड नाही आश्या लोकांची यादी तयार करून शासनाकडुन त्यांना धान्य मिळवून देण्याचे मोठे कार्य केले जात आहे.जनधन खाते धारकास प्रतिमाह ५००/- रु केंद्र सरकार कडून देण्यात आले आहे परन्तु अनेक लोकांकडे जनधन खाते नाही असे लोक लाभापासून वंचीत राहिले.अश्यांची माहिती भाजपचे कार्यकर्ते गोळा करीत आहे. व त्यांना जनधन खाते खोलून देण्याचे मदतकार्य करीत आहे.यात कुठलेही वैयक्तिक माहिती घेतल्या जात नाही. वा कुण्याच्या बँक खात्याची माहिती वा आधार कार्ड नंबर नाही त्यामुळे .त्यांची वैयक्तिक माहिती म्हणता येणार नाही. ज्यांचे कडे राशन कार्ड नाही,त्यांना नवीन कार्ड बनवून देण्याचे,ज्यांचे मतदान यादीत नाव नाही त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्याकरिता मदत करणार आहे,निराधार लोकांची यादी घेऊन त्यांना शासनाचा लाभ मिळवून देण्याचे उत्तम कार्य भाजप करीत आहे.जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यामुळे आम्हच्या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. व हे कार्य प्रहारचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिटकर वा इतर कुठलाही पक्ष करत नाही.त्यामुळे त्यांना हे उत्तम कार्य पचनी पडत नाही.त्यामुळे ते चुकीची अफवा पसरविण्याचे काम करीत आहे.तरी जनतेनी अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता आम्हचे कार्यकर्त्याला सवीस्तर माहिती द्यावी. व आवश्यक त्या ठिकाणी पक्ष्यातर्फे आम्ही मदत करू. असे आव्हान सुद्धा केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या