चिमूर : चिमूर पंचायत समिती विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे (५५) यांना व ग्राम पंचायत भिसी येथील सरपंच सौ . योगिता अरूण गोहणे (३४) व उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड (४५) यांचेसह ३०,००० / – रू . ची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर चे पथकाने रंगेहात पकडले आहे . त्यामुळे पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे .
सविस्तर वृत्त असे की , यातील तक्रारकर्ते यांना ग्राम पंचायत भिसी येथे ग्रामसेवक असतांना ग्राम पंचायत भिसी अंतर्गत होणाऱ्या कामांचा ई – टेंडरींग ची प्रक्रीया बरोबर राबवीली नाही असा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते, सदर प्रकरणाची तक्रारदार व ईतर काही लोकांविरूद्ध पंचायत समिती चिमूर येथील विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांच्या मार्फत चौकशी सुरू होती . सदर चौकशीतून तक्रारदार यांचे नाव काढण्याकरीता विस्तार अधिकारी हुमणे यांनी ३०,००० / - रू लाचेची मागणी केली व विस्तार अधिकारी हुमणे यांना लाच देण्याकरीता ग्रा.पं. भिसीचे सरपंच सौ . योगिता गोहणे व उपसरपंच लिलाधर बन्सोड यांनी तक्रारदारास चुकीची वागणुक दिली . तक्रारदार यांस विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने तसेच विस्तार अधिकारी यांना लाच देण्याबाबत ग्राम पंचायत भिसीचे सरपंच सौ . योगिता गोहणे तसेच उपसरपंच लिलाधर बन्सोड हे अपप्रेरित करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार नोंदविली . लाच – लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पो.नि. श्री . निलेश सुरडकर यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून पंचायत समिती चिमूर येथील विस्तार अधिकारी ( पंचायत ) व ग्राम पंचायत भिसीचे सरपंच , उपसरपंच यांचे विरूध्द योजनाबध्दरित्या सापळा कार्यवाहीचे आयोजन केले . त्यामध्ये विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांनी तकारदारा विरूध्द सुरू असलेल्या चौकशीतून त्यांचे नाव काढण्याचे कामाकरीता ३०,००० / – रू . ची मागणी करून सरपंच , उप सरपंच यांचे समक्ष स्विकारली त्यावरून विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांचे विरूध्द तसेच तकारदारास लाच देण्यास अपप्रेरीत केल्याने ग्राम पंचायत भिसीचे सरपंच सौ . योगिता अरूण गोहणे व उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड यांचे विरूध्द पो.स्टे . चिमूर जि . चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक श्री . राजेश दुद्दलवार याचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्री . अविनाश भामरे , पो.नि. निलेश सुरडकर , ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार , ना . पो.कॉ. अजय बागेसर , ना.पो.कॉ. अरूण हटवार , पो.कॉ. संदेश वाघमारे , रोशन चांदेकर , नरेश नन्नावरे , म.पो.काँ समीक्षा भोंगळे व चालक दामोदर करबे सर्व लाच – लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या