बल्लारपूर : इनर्व्हील क्लब बल्लारपूर ने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला.डॉक्टर्स हे ईश्वराचं रूप असतात .समाजात सतत आपली सेवा देत असतात.सामाजिक कार्यात अग्रेसर इनर्व्हील क्लब ने डॉक्टर्स डे निमित्य ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील डॉ.अर्पिता वावरकर , डॉ.गजानन मेश्राम, डॉ. डांगे, डॉ.गावरकर डॉ.कांबडे तसेच सर्व नर्स,कम्पाउंडर, कर्मचाऱ्यांसोबतच कोरोना वारीयर्सचाही सत्कार केला.
या सत्कारप्रसंगी इनर्व्हील क्लब बल्लारपूरच्या अध्यक्षा संगीता शेंडे,सचिव आरती अक्केवार, सदस्या योगिता मेनेवार, रानु खत्री,श्वेता भोरे,किरण तिवारी,व इतर सर्व क्लब सदस्य उपस्थित होते.
आज चंद्रपूरात लावली पावसाने हजेरी !
चंद्रपूर : आज गुरूवार दि. 2 जुलै रोजी आभाळ गडगडून व विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. गर्मीच्या उकाळ्याने चंद्रपूरकरांना हैराण केले होते, आजच्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वृत्त लीहीस्तोवर विजेचा कडकडाट सुरू होता परंतू पावसाची मात्र रिमझिम सूरू होती.
0 टिप्पण्या