कोरोना संकटात पोलिसांना "पोलीस योद्धां"ची साथ !



प्रातिनिधिक स्वरूपात रोहित तुराणकरसह चार युवकांना पोलीस योद्धा म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते किट प्रदान !

चंद्रपूर : कोरोना संकटात पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावेत, यासाठी पोलीस योद्धा उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते २७ जुलै रोजी करण्यात आला. तर भरोसा सेल या उपक्रमाचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला असून, पीडित महिला व बालके यांच्याकरिता एकाच छताखाली समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. पोलीस योद्ध्याची कीट देण्यात आली. मैदानावर हा कार्यक्रम आयोजित या किटमध्ये टी-शर्ट, आयकार्ड करण्यात आला होता. तसेच सुरक्षेविषयीच्या वस्तू देण्यात आलेल्या आहेत. प्रतिनिधीक पासून तर कोविड केअर सेंटरवरील बंदोबस्तापर्यंत पोलीस विभागाला अनेक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. पोलीस विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस योद्धा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील युवकांना पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत मध्ये ४०० युवकांनी सहभाग दर्शविला आहे. पोलिस योद्धा म्हणून सहभागी झालेल्या युवकांना पालकमंत्री यांच्या हस्ते योद्ध्याची किट देण्यात आली. या किटमध्ये टि-शर्ट, आय कार्ड तसेच सुरक्षासंबंधीच्या वस्तु देण्यात आल्या. प्रातिनिधिक स्वरूपात रोहित तुराणकरसह चार युवकांना पोलीस योद्धा म्हणून ही किट पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमात कोविड अनुषंगाने सुरक्षिततेची साहीत्य सॅनिटायजर, हॅन्ड वॉश, मास्क, फेस शिल्ड,हॅन्ड ग्लब्ज, स्कार्प, टि-शर्ट व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

मा. ना. विजय वडेटटीवार, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा यांचे शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, राहुल कार्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपुर, शेखर देशमुख, पोलीस उपअधीक्षक(गृह) यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या