सारंग पेंचलवारच्या यशाचे सर्वत्र कौतुक !



आक्सापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या सिबिएसई दहावी बोर्डाच्या परिक्षेत बिजेएम कारमेल ॲकाडेमी चंद्रपूर या विद्यालयाचा विद्यार्थी असलेला सारंग नागेश पेंचलवार यांनी ९२.२०% गुण मिळवून मोठे यश प्राप्त केले.या यशाबद्दल सारंगचे जिल्हात सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपुर येथील प्रसिद्ध विद्यालय बिजेएम कारमेल ॲकाडेमीची गौरवास्पद परंपरा याहीवेळी कायम राहिली.विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.त्यात ९५ टक्केच्यावर ७ मुले आहे तर ९० च्यावर ५१ विद्यार्थी आहेत.सारंगनी गणितात ९६, विज्ञान ९५,हिंदीत ९४,इंग्रजी विषयात ९१ तर सोशल सायन्समध्ये त्यानी ८५ असे एकुन ४६१ गुण पटकावले आहे.विद्यालयात सारंग हा १४ वा टापर आहे.सारंगचे वडील नागेश पेंचलवार हे गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात पोलीस बिनतारी संदेश विभागात पोलीस उपनिरीक्षक (अभियांत्रिकी) या पदावर कार्यरत आहेत.विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक कुमार,देवरीचे शिक्षक खरवडे व चंद्रपुर येथील बिजीएम कारमेलचे मुख्याध्यापक आणि सर्व विषयाच्या शिक्षकासह आई माया नागेश पेंचलवार,आजी शालू व आशा,आजोबा प्रभाकर ईलमूलवार व शालिनी पेंचलवार यांना देत आहे. सारंगचे भविष्यात युपीएसई करून भारतीय पोलीस सेवेत येण्याची स्वप्नं आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या