जिल्ह्यात आज 47 बाधित, जिल्ह्यात एकंदर 1495, आज एकाचा मृत्यू, मृतकांची संख्या 16 !



  • आतापर्यंत 998 बाधित कोरोनातून बरे, 481 बाधितांवर उपचार सुरू!

चंद्रपूर, दि. 24 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1495 पर्यंत पोहोचली असून जिल्ह्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 998 तर उपचार सुरू असणाऱ्या बाधितांची संख्या 481 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यापैकी 2 बाधित जिल्ह्याबाहेरील आहे. मृत्यू पावलेले बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने ग्रस्त होते.

डब्ल्यूसीएल कॉलनी भद्रावती येथील 53 वर्षीय बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधित हा कोरोना अतिरिक्त न्युमोनिया आजाराने ग्रस्त होता. 23 ऑगस्टला दुपारी दीड वाजता डब्ल्यूसीएल रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्याचदिवशी 23 ऑगस्टला सायंकाळी 7:30 च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 24 तासात विविध ठिकाणच्या चाचण्यांमध्ये 47 बाधित पुढे आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील बाधितांची वाढ कायम असून आज 29 बाधित पुढे आले आहे. मुल येथील 8, गोंडपिंपरी येथील 3, भद्रावती येथील 5, ब्रह्मपुरी दोन अशा एकूण 47 बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचणी सुरू आहे. त्यामुळे बाधित पुढे येत आहेत. चंद्रपूर शहरातील रामनगर , गंजवार्ड , रामनगर सिंधी कॉलनी परिसरातील, महेश नगर तुकूम, बाबूपेठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील, जगन्नाथ बाबा नगर, भानापेठ वार्ड, अरविंद नगर, पठाणपुरा वार्ड, मेजर गेट, नगीना बाग, शिवाजीनगर, समाधी वार्ड तर चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस या भागातील बाधित पुढे आले आहेत. मुल शहरातील तर तालुक्यातील चिंचाळा गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरी गावातील बाधित पुढे आले आहेत. भद्रावती येथील नेताजी नगर परिसरातील बाधित ठरले आहेत.

अँन्टीजेन तपासणी विषयक माहिती : जिल्ह्यात 22 हजार 784 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 426 पॉझिटिव्ह असून 22 हजार 358 निगेटिव्ह आहेत.

शहरात येथे असणार अँन्टीजेन चाचणी केंद्र : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे अँटीजेन चाचणी केंद्र जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केलेले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध आहे.

तपासणीचा निकाल तात्काळ : कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ 15 ते 30 मिनिटाचा असतो. त्यामुळे निदान व उपचार करण्याची प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे.

वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या : जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1495 झाली आहे. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 31 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 126 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 634 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 384 बाधित, 61 वर्षावरील 90 बाधित आहेत. तसेच 1495 बाधितांपैकी 1009 पुरुष तर 486 बाधित महिला आहे.

राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या : 1495 बाधितांपैकी जिल्ह्यातील 1 हजार 389 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 43 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 63 आहे.

जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती : जिल्ह्यात सध्या 144 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 183 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. असे एकूण 327 कंटेनमेंट झोन होते.या 327 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 680 आरोग्य पथकाद्वारे 24 हजार 832 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 98 हजार 896 आहे.

जिल्ह्यातील अलगीकरण विषयक माहिती : जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 973 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 74 नागरिक, तालुकास्तरावर 371 नागरिक तर, जिल्हास्तरावर 528 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 236 नागरिक दाखल झाले आहेत. 92 हजार 767 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 1 हजार 469 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या