कंत्राटदारांचा "देशद्रोही" उल्लेख असलेल्या जी. आर. ची होळी!



"तो" काळा जीआर रद्द करा-जयंत मामीडवार

सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गदर्शक सूचना महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, कंत्राटदारांना देशद्रोही म्हणून बदनामी करण्याचे काहीही कारण नाही. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणि देशद्रोही असे शब्द वापरुन कंत्राटदारांना शासनाकडूनच लक्ष्य करणे निंदणीय आहे. त्यामुळे हा काळा जीआर रद्द करुन कंत्राटदारांची बदनामी थांबावी, अशी मागणी विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी आंदोलनादरम्यान केली.
चंद्रपूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जुलै 2020 रोजी जारी केलेल्या जीआरमध्ये कंत्राटदारांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप करून विदर्भ कंत्राटदार संघटनेने मंगळवारी या जी.आर. ची बांधकाम विभाग कार्यालयासमोर मंगळवार दि. 4 अॉगस्ट ला दुपारी होळी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांची नामनोंदणी करण्याबाबत ३० जुलै २० रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये विविध नियमांची यादी देण्यात आली आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण जी.आर. च्या पहिल्या पानातील प्रस्तावनेत कंत्राटदारांचा 'देशद्रोही' असा उल्लेख करण्यात आला. शासनाच्या नियमांचे पालन करून विविध प्रकारचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांचा असा आक्षेपार्ह उल्लेख करणे अन्यायकारक आहे. विकासात कंत्राटदारांचे योगदान महत्त्वपूर्ण असतानाही शासनाने देशद्रोहींच्या रांगेत बसविले. त्यामुळे हा आदेशच रद्द करावा, या मागणीसाठी विदर्भ कंत्राटदार असोशिएशनने सा. बां. कार्यालय, प्रादेशिक कार्यालय, मंडळ, विभागीय व उपविभागीय कार्यालयासमोर होळी करून निषेध नोंदविला. यावेळी विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष जंयत मामीडवार,सचिव श्रीकांत भोयर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या