आ. सुधीर मुनगंटीवार यांची देशातील प्रेरक विधायक म्हणून निवड !



फेम इंडिया - एशिया पोस्ट तर्फे 50 मधील प्रेरक आमदार च्या श्रेणीत निवड !


फेम इंडिया - एशिया पोस्ट या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या 50 उम्दा विधायक सर्व्हे 2020 अर्थात देशातील 50 उत्कृष्ट आमदारांचा विविध श्रेणीत केलेल्या सर्व्हेत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रेरक आमदार या श्रेणीत निवड करण्यात आली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार 1995 मध्‍ये पहिल्‍यांदा विधानसभेची निवडणूक लढले व 55 हजाराच्‍या वर मताधिक्‍याने विजयी होत ते विधानसभेत पोहचले. विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत आपल्‍या अभ्‍यासू बाण्‍याने त्‍यांनी आपली छाप जनमानसावर सोडली. अनेक प्रश्‍न व समस्‍यांचा मार्ग त्‍यांच्‍यामुळे सुलभ झाला. अनेक निर्णय घेण्‍यास त्‍यांनी शासनाला भाग पाडले. राष्‍ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्‍कृष्‍ट आमदार पुरस्‍कार त्‍यांना तत्‍कालीन राज्‍यपाल डॉ. पी.सी. अलेक्‍झांडर यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. हा त्‍यांच्‍यातील लोकप्रतिनिधीचा गौरव ठरला. आ सुधीर मुनगंटीवार सलग 6 टर्म विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी अनेक निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडले. आमदार म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे . काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या संसदीय कार्यावर शोध प्रबंध लिहिले आहेत . त्यामुळेच त्यांना *प्रेरक आमदार* या श्रेणीत गौरविण्यात आले आहे .
राज्याचे अर्थ व वनमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली आहे. अर्थमंत्री म्‍हणून राज्‍याच्‍या आर्थिक विकासात बहुमोल योगदान त्‍यांनी दिले. वनमंत्री म्‍हणून हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबवित अवघा हिरवागार करण्‍यासाठी त्‍यांनी तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. ही मोहीम विक्रमी ठरली. लिम्‍का बुक ऑफ रेकार्डने या मोहीमेची नोंद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप देत ‘मन की बात’ मधून या मोहीमेचे कौतुक केले. महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा त्‍यांचा गौरव केला. आफ्टरनुन व्हाईस या समूहातर्फे ‘बेस्‍ट परफॉर्मींग मिनीस्‍टर’ या पुरस्‍काराने त्‍यांचा गौरव झाला. जेसीआय महाराष्‍ट्र ने ‘मॅन ऑफ द इयर’, लोकमत समूहाने ‘महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर’ , लोकसेवा आणि विकास संस्‍थेने कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार सन्‍मान असे विविध प्रतिष्‍ठेचे पुरस्‍कार त्यांना बहाल करण्‍यात आले व त्‍यांच्‍या कर्तृत्‍वाचा गौरव करण्‍यात आला.
फेम इंडिया तर्फे देशातील प्रेरक आमदार म्हणून झालेली त्यांची निवड त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी चा गौरव करणारी आहे. आ. मुनगंटीवार यांच्यासह आ. आशिष शेलार यांची उत्कृष्ट , आ. देवयानी फरांदे यांची भविष्यवादी तर आ. डॉ भारती लव्हेकर यांची दूरदर्शी आमदार या श्रेणीत निवड निवड करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या