कोरोनटाईन "राजेश‌ बेले" यांच्या घरावर मनपाचे "बुलडोजर"!



  • मनपा प्रशासनाची भूमिका व स्थानिक नेत्यांची "चुप्पी" संशयाच्या भोवऱ्यात !
  • कारवाई नियमानेचं, आकसापोटी नाही-मनपा प्रशासनाचे मत !

चंद्रपूर : स्थानिक जटपुरा गेट परिसरात राहणारे राजेश बेले यांना covid-19 चे बाधित म्हणून उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जटपुरा गेट परिसरात वास्तव्यास असलेले राजेश बेले यांचे घर अतिक्रमण असल्याचे कारण देऊन महानगरपालिकेने त्यावर बुलडोझर फिरवला. राजेश बेले यांनी ज्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्याठिकाणी व्यवस्था बरोबर नाही याचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त ठिकाणी हाल हलविण्यात आले, जर त्यांनी केलेले आरोप चुकीचे होते तर त्याची चौकशी होणे गरजेचे होते परंतु तसे न करता एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर त्यांना हलविण्यात आले व अतिक्रमणाच्या भाग म्हणून त्यांचे घर पाडण्यात आले. मनपा प्रशासनाची ही "भूमिका" व स्थानिक नेत्यांची "चुप्पी" हा सध्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. राजेश बेले यांच्या म्हणण्यानुसार आकसापोटी करण्यात आलेली ही कारवाई आहे. मी मनपा प्रशासनाची पोलखोल केली म्हणून मनपा प्रशासनाने माझ्या घरावर बुलडोजर चालविले. चंद्रपूर शहरात अतिक्रमणाचे अनेक प्रकरणे आहेत परंतु तडकाफडकी कारवाई ही कुठेच करण्यात आली नाही. राजेश बेले यांच्या संदर्भात मनपा प्रशासनाने घेतलेली भूमिका ही एवढी संशयास्पद आहे तेवढीचं जागरूक स्थानिक नेत्यांची "चुप्पी" संशय निर्माण करणारी आहे. कोणत्याही स्थानिक नेत्याने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले नाही परत मनपा प्रशासन यावर सावध पवित्रा घेत आहे.

यासंदर्भात बोलताना मनपा प्रशासनाने राजेश बेले यांना आठ ऑगस्ट रोजी अतिक्रमणात संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती, त्याच नोटीसच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे मत व्यक्त केले आहे. कारवाई नियमानुसार असून आकसापोटी केलेली नाही, असे स्पष्ट मत मनपा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहर अतिक्रमण मध्ये वसलेले शहर आहे. अनेक नेत्यांचे, व्यावसायिकांचे अतिक्रमण शहरामध्ये आहे. त्याविषयी नोटीस बजावल्या नंतरही त्यांच्यावर महानगरपालिकेने कारवाई केली नाही. न्यायालयाचे आदेश निघाल्यानंतर सुद्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात प्रशासन मागे राहिले मग राजेश बेले यांचेचं तडकाफडकी का बर तोडण्यात आले? हा संशोधनाचा विषय आहे आहे.

सामजिक कार्यकर्ते राजेेेश बेले हे मनपा प्रशासनाच्या देखरेखेखाली कॉरोनटांईन सेंटरमधे असताना त्यांच्या घराचे बांधकाम मनपा प्रशासनाने तातडीने तोडले कसे ? हा गंभीर प्रश्न असून मनपा प्रशासनाला अशी कुठली घाई झाली ? राजेश बेले यांनी कॉरोनटांईन सेंटरमधे निकृष्ट जेवण,असूविधा व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळेच सूडबुद्धीने त्यांच्या घरांचे बांधकाम तोडून मनपा प्रशासनाने आपला सूड उगारला असल्याचे बोलल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या