- कोविड 19 चा सामना करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा वैशिष्टयपूर्ण उपक्रम !
बल्लारपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरात गरम पाण्याच्या 10 पाणपोई नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्यांच्या आमदार निधीतून सदर गरम पाण्याच्या पाणपोई शहरात उपलब्ध होणार आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या महामारीचा सामना करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी या पाणपोई बल्लारपूर शहरात मंजूर केल्या आहेत.
नेहमी अभिनव तसेच वैशिष्टयपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातुन जनतेची सेवा आ. मुनगंटीवार करीत असतात. कोविड 19 च्या महामारीचा सामना करताना त्यांनी सॅनिटायझेशनला विशेष प्राधान्य देत प्रारंभीच्या काळात सॅनिटायझर व मास्कचे वितरण नागरिकांमध्ये केले. त्यानंतर पोलिस स्टेशन, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे याठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन त्यांनी उपलब्ध केल्या. कोविड 19 चा सामना करताना गरम पाण्याचा वापर अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. आयुष मंत्रालयाने प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या उपायांमध्ये गरम पाणी पिण्याचा उपाय प्रामुख्याने सांगीतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुध्दा मन की बात या कार्यक्रमात प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने गरम पाण्याचे महत्व अधोरेखित केले आहे. ही बाब लक्षात घेता गोरगरीब जनतेला गरम पाणी सहज व निःशुल्क उपलब्ध व्हावे यादृष्टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या आमदार निधीतुन 10 गरम पाण्याच्या पाणपोई बल्लारपूर शहरात उपलब्ध केल्या आहेत. येत्या आठवडाभरात या पाणपोई बल्लारपूरकरांच्या सेवेत रुजू होतील.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या या पुढाकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, बल्लारपूर भाजपाचे अध्यक्ष काशी सिंह, मनिष पांडे, निलेश खरबडे, शिवचंद द्विवेदी, सौ. रेणुका दुधे, अॅड. रणंजय सिंह, समीर केने, अजय दुबे, राजू गुंडेट्टी, नगरसेवक अरूण वाघमारे, महेंद्र ढोके, जयश्री मोहुर्ले, स्वामी रायबरम, पुनम निरांजने, आशा संगीडवार, सुवर्णा भटारकर, सारीका कनकम, गणेश बहुरीया, सुमन सिंह, राकेश यादव, येलय्या दासरप, सारखा बेगम यांनी त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या