अफलातून कारभार : कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाही व वाघमारे यांनी परस्पर केली रक्कम हडप !



  • गडचांदूर न. प. रक्कमेची वाघमारे यांचेकडून अफरातफर !!
  • सी.ओ. शेळकी तथा संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा.
  • भाजपचे नगरसेवक नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी !!

गडचांदूर च्या मुख्याधिकारी डॉ. शेळकी यांची सखोल चौकशी कां नाही ?

गडचांदुर न.प. च्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत गडचांदूर च्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांची मिलीभगत असल्याच्या आरोप होत असतांना त्यांच्यावर कारवाई कां करण्यात येत नाही? अशी मागणी आता गडचांदूरवासी करून राहीले आहे. गडचांदूर मध्ये आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत. नुकतेच आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग या ठिकाणचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. प्रमोद वाघमारे नावाचे आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या पैशाच्या अफरातफरी चा मामला चर्चेचा विषय आहे. भ्रष्टाचारी-अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचे आता सिद्ध होऊन राहिले. कोरोनाच्या नावावर "अस्वच्छतेचा बाजार" गडचांदूर मध्ये मांडला गेला आहे. मागील दीड वर्षापासून डॉ. विशाखा शेळकी या गडचांदूर च्या मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहे. त्यावेळेस पासून त्या पूर्ण कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



गडचांदूर : नगर परिषद गडचांदूर येथे मागील पाच - सहा महिन्यापासून सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन नाही तरी त्यांनी कोरोनासारख्या महामारीत जीव ओतून काम केले. याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केलीअसता न. प. च्या फंडात पैसा नसल्याचे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांना माहिती दिली. तेव्हा डोहे यांनी न. प. च्या फंडाची एवढी गंभीर परिस्थिती कां म्हणून चौकशी केली व माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेतली असता माहे जून २०१९ मध्ये काही आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागा कडून निविदा मागविण्यात आल्या. तेव्हा एकूण नऊ निविदा धारकाने निविदा भरल्या व कोऱ्या निविदा प्रपत्राची व अनामत रक्कम आरोग्य विभाग लिपिक श्री प्रमोद वागमारे यांचे कडे दि २१/६/२०१९ ला भरली.परन्तु सदरची रक्कम लेखाविभागात न भरता प्रमोद वागमारे यांनी ती परस्पर अफरातफर केली.असे असताना सदरच्या निविदा उघडताना निविदा उघडणारी समिती ( मुख्याधिकारी,लेखापाल व विभाग प्रमुख) यांनी सदरची पाहणी करून निविदा अपात्र ठरवायला हवी परन्तु या सर्वांचे संगनमत असल्याने सदरच्या निविदाला पात्र ठरविले.व स्थायी समितीत सादर करून दर निश्चित करून घेतले.
पाणी पट्टीची जमा झालेली अंदाजे लाख रुपये पाणी पुरवठा लिपिक प्रमोद वागमारे यांनी परस्पर अफरातफर केली.व यापूर्वीच्या पाणी पुरवठा लिपिकाने सुद्धा दोन ते तीन लाख रुपये अफरातफर केली असल्याचे कळते तरीपण पण मुख्याधिकारी तथा लेखापाल यांनी त्यांचे विरुद्ध कुठलीही कार्यवाई केली नाही.जेव्हा की प्रमोद वागमारे यांना तत्कालीन मुख्याधिकारी यांनी त्यांच्या गैरवर्तुनिकी व पैश्याच्या अफरातफर विषयी दि ६/२/२०१८ ला निलंबित केले व आठ महिन्यांनी त्याचे कडून पुनच्च अशी चूक माझे कडून होणार नाही अश्या आशयाचे करार लीहून घेऊन परत त्याला दि ३०/१०/२०१८ ला न प मध्ये रुजू करून घेतले. असे असताना तो परत तीच चूक करीत आहे व मुख्याधिकारी त्याची पाठराखण करीत आहे.त्यामुळे निश्चित सदरची अफरातफर ही यांच्या संगनमताने झाल्याची दाट शक्यता येते.असा आरोप विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला व पुढे असेही म्हणाले की अश्याच प्रकारे नगर परिषद कडून आठवडी व गुजरी बाजार लिलाव करण्यात आला. परन्तु त्या ठेकेदारा कडून मुख्याधिकारी तथा कर विभाग प्रमुख वनमोरे यांनी संगनमत करून स्वतःचा स्वार्थ साधून त्यांना लिलवाची रक्कम भरण्यास मुभा दिली व नाममात्र त्यांना वारंवार रक्कम न भरल्यास कार्यवाई करण्याचे नोटीस बजावले परन्तु कुठलीच कार्यवाई केलेली नाही त्यामुळे नगर परिषद ची जवळपास ४ लाख रुपये थकले.यांनी योग्यशिर नियम अटीं प्रमाणे कार्यवाई वेळीच केली असती तर सदरची रक्कम थकली नसती व आज सफाई कामगारांचे वेतन रुकले नसते.त्यामुळे सदर प्रकरणाची नगरसेवक अरविंद डोहे यांनी मा जिल्हाधिकारी तथा राज्याचे नगरविकास मंत्री,आयुक्त तथा संचालक व सहसचालक यांना निवेदन देऊन उच्च स्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी तथा संबंधित कार्मचाऱ्याविरुद्ध उच्च स्तरीय चौकशी करून निलंबनाची कार्यवाईची मागणी केली आहे आता यावर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतील याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या