- अॅड. पारोमिता गोस्वामी चे मंगळवार दि. 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण !
- चंद्रपूरातील खाजगी जम्बो हॉस्पिटल "कोरोना" च्या नावाने व्यवसाय !
- कोरोना जागतिक "महामारी" की भ्रष्ट नेत्यांची "लुटमारी" ❓
- आज जिल्ह्यात 274 बाधित व 4 मृत !
चंद्रपूर : सोमवार दिनांक 21 रोजी साडेतीन वाजता आलेला जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीनुसार चंद्रपुरात एकूण बाधितांची संख्या 8090 आहे, आज एकाच दिवशी जिल्ह्यात 274 बाधित मिळाले तर मृतकांची संख्याही 111 झाली आहे. आज जिल्ह्यात चार बाधित मृत पावले आहेत.
कोरोना या आजाराचा महाराष्ट्रामध्ये बाजार करून टाकला आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, डॉक्टरांची संख्या अपुरी आहे, रोज मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नवनवीन घोषणा रोज जिल्ह्यामध्ये दिल्या जात आहेत परंतु बाधितांच्या "मर्मा"वर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा व शासन कमी पडत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर रोडवर जम्बो कोरोना हॉस्पिटल उघडण्यात येणार आहे, त्याची तयारीही सुरू झाली आहे. या रुग्णालयात उपचारासाठी आकारण्यात येणारे दर सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. "श्रीमंतांचा उपचार व गरिबांना मरण" या धोरणाखाली हे जंबो हॉस्पिटल चंद्रपुरात साकारत आहे. या व्यावसायिक धोरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक 22 रोजी "आप" ने एल्गार पुकारला असून "आप" च्या एड. पारोमिता गोस्वामी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक करणार आहेत.
अपुरी उपचारव्यवस्था, डॉक्टर व रुग्णामध्ये संवादाचा अभाव यामुळे उपचार करणाऱ्या नागरिकांचा रोष शासकीय रुग्णालयाप्रती वाढणारच म्हणजे या स्थितीचा फायदा घेत काही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी शहरात खाजगी जम्बो हॉस्पिटल तयार करायचे व शासकीय रुग्णालयात उपचार करीत असलेल्या नागरिकांना तिथेच मरु द्यायचे का असा सवाल आम आदमी पक्षाच्या पारोमिता गोस्वामी यांनी शासनाला विचारला आहे. त्या खाजगी कोविड सेंटरला परवानगी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या, स्वतःचे भले करायचे काय चाललंय या कोरोनाला तर तुम्ही बाजार बनविला आहे हे आम आदमी पक्ष कदापि सहन करणार नाही, श्रीमंत असलेल्या पुण्यात मात्र शासकीय जम्बो कोविड रुग्णालय आणि गरीब असलेल्या चंद्रपुरात मात्र खाजगी जम्बो रुग्णालय हा कुठला न्याय? चंद्रपूरकरांना चांगल्या उपचारापासून वंचित करायचे हे आम्हाला मान्य नाही, हे आधी थांबायलाचं हवं.
कोरोना जागतिक "महामारी" की भ्रष्ट नेत्यांची "लुटमारी" ❓
आधी शासकीय आरोग्य यंत्रणेला निधी द्यायचा नाही!
सरकारी दवाखान्यात अंदाधुंदी निर्माण करायची!!
कोरोना ने लोकांना शासकीय रुग्णालयात *मरू द्यायचे!!!*
*लोकांचा रोष* सरकारी रुग्णालयावर तयार करायचा!!!!
त्यानंतर *आपल्या भागीदारीत कंपनी* तयार करून
या कंपनीचे *खाजगी जम्बो* कोविंड सेंटर सुरु करायचे!!!!!
या कोविड सेंटरला परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक ते *अधिकारी बदली करून आणायचे!!!!!!*
आणि कोरोणाच्या महामारीत स्वतःचे भले करायचे!!!!!!!
*महाविकास आघाडीचा महाभ्रष्टाचार*❓
आश्चर्य म्हणजे
*विरोधी पक्षाचे नेते* ही विचारीत नाही की,
*श्रीमंत असलेल्या पुणे जिल्ह्यात शासकीय जंबो कोविड रुग्णालय*
तर
*गरीब असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात खाजगी जम्बो कोवीड रुग्णालय का*❓
पश्चिम महाराष्ट्राला (पुणे) न्याय❗
आणी विदर्भावर (चंद्रपूर) अन्याय❗❗
संपणार नाही काय❓
आपल्या नेत्यात ती *धमक* नाही की स्वतःचा *धंदा* वाढवायचा आहे❓
कोरोना ची भिती दाखवा व आपला व्यवसाय करा. असा मार्ग या सरकारने अवलंबिला असल्याचे दिसत आहे. आरोग्य सेवा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु या ठिकाणी सरकार कमी पडत असून त्याच्या बाजार मांडला जात आहे जनतेमध्ये आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात रोष निर्माण झाला असून जीवाची भीती ही निर्माण झाली आहे. ही बाब कुठे तरी थांबायला हवी. महाराष्ट्राची स्थिती भयावह आहे चंद्रपूर जिल्हा दिवसेंदिवस या भयावह स्थितीला सामोरे जात आहे परंतु निर्दयी शासन-प्रशासनाला याची काही देणे-घेणे नाही असे दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ त्यासोबतच मृतकांच्या वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून यावर त्वरित तोडगा महाराष्ट्र सरकारने काढला नाही तर त्याचे परिणाम विपरीत होती अशा स्पष्टपणे सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे. शासन फक्त आपली खुर्ची सांभाळण्यात मग्न असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या